शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षानंतर होणार काँक्रिटीकरण

By admin | Updated: June 28, 2017 03:16 IST

ब्रिटीश राजवटीत बनवलेला मुंबई - आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा -वंजारपट्टीनाका दरम्यानचा रस्ता ४५ वर्षानंतर पुन्हा सिमेंटचा बनवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : ब्रिटीश राजवटीत बनवलेला मुंबई - आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा -वंजारपट्टीनाका दरम्यानचा रस्ता ४५ वर्षानंतर पुन्हा सिमेंटचा बनवण्यात येणार आहे. यासाठी ४८ कोटीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजूर केला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका हा पाच किलोमीटरचा रस्ता शहरातून जातो. १९७० च्या दरम्यान या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. रस्त्याची वारंवार दुरूस्ती करावी लागत असल्याने तत्कालीन सरकारने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवला. यंत्रमाग उद्योग वाढल्याने या रस्त्यावरील जडवाहनांची वर्दळ वाढली. १९९२ च्या दरम्यान हा रस्ता नगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतला. पालिकेने आजतागायत या रस्त्यासाठी कोट्यवधी खर्चूनही रस्त्यामधील चढउतार कमी करता आले नाही. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार खड्डे पडून वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी साठेआठ कोटी खर्चून पुन्हा हा रस्ता बनवण्यात आला. मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराने पुन्हा या मार्गावर खड्डे पडून वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ लागले. तसेच रात्रीच्यावेळी नारपोली व शहर वाहतूक पोलीस अवजड वाहने या शहरातील रस्त्यावरून पाठवत असल्याने त्याचा परिणामही रस्त्यावर होत होता. मात्र याबाबत पालिका प्रशासन व नगरसेवकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तर महापालिकेकडे पैसे नसल्यामुळे काम करता येत नव्हते. त्यामुळे या मार्गावरून नियमित जाणाऱ्या नागरिकांच्या,विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या तक्रारी वाढल्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासाठी ४८ कोटी ३१ लाखाचा निधी मंजूर केल्याने नव्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.