शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

४५ वॉर्डन देऊनही कोंडी कायम : उल्हासनगर पालिकेचा पगारावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:26 IST

शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना ४५ वॉर्डन दिले. पण, शहरातील कोंडी काही सुटली नाही. उलट, त्यांच्याविरोधात तक्रारी येत होत्या. वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये पालिका खर्च करते. पण, कोंडीची परिस्थिती जैसे थे असल्याने सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी वॉर्डन देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्याची विनंती स्थायी समितीला केली.

 - सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना ४५ वॉर्डन दिले. पण, शहरातील कोंडी काही सुटली नाही. उलट, त्यांच्याविरोधात तक्रारी येत होत्या. वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये पालिका खर्च करते. पण, कोंडीची परिस्थिती जैसे थे असल्याने सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी वॉर्डन देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्याची विनंती स्थायी समितीला केली. यावर, एकमत होऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कोंडी सोडवण्याचे काम वाहतूक पोलिसांचे असून त्यात अपयशी झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे पुरस्वानी यांनी सांगितले.उल्हासनगरमधील नागरिक वाहतूककोंडीने हैराण झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत वाहतूक पोलिसांना सुरुवातीला २५ व नंतर २० असे एकूण ४५ वॉर्डन दिले. तसेच जॅमरसह इतर साहित्य दिले. वाहतूक पोलिसांच्या मदतीला ४५ वॉर्डन दिल्याने वाहतूककोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, वॉर्डनसह वाहतूक पोलीस शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यात पोलीस अपयशी ठरले. कोंडी सुटण्याऐवजी दंडाच्या पावत्या फाडणे, वसुली करणे आदी प्रकार घडू लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेला केल्याचे पुरस्वानी यांनी सांगितले.महापालिका वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये खर्च करते. मात्र, कोंडी जैसे थे असल्याच्या तक्रारीत वाढ झाली. पुरस्वानी यांनी स्थायी समिती सदस्यांसमोर वॉर्डनचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. लाखो रुपये खर्च करूनही वाहतूककोंडी सुटत नाही. मग, वाहतूक पोलिसांच्या मदतीला वॉर्डन कशाला, अशी भूमिका घेतली.स्थायी समितीच्या सर्वच सदस्यांनी पुरस्वानी यांच्या मताशी संमती दर्शवत वॉर्डनचा विषय सर्वमतांनी नामंजूर केला. कोंडी सोडवण्याचे काम शहर वाहतूक पोलिसांचे आहे. त्यांनी कोंडी न सोडल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया पुरस्वानी यांच्यासह महापौर मीना आयलानी, प्रकाश माखिजा यांनी दिली आहे. यामुळे कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सर्वाधिक वाहतूककोंडीची ठिकाणेशहरातील जपानी व गजानन मार्केट रस्ता, शिरू चौक, नेहरू चौक, शिवाजी चौक, १७ सेक्शन, फॉरवर्ड लाइन चौक, कॅम्प नं १ ते ५ परिसरातील मुख्य रस्ते, व्हीनस चौक, पवई चौक, शहाड फाटक रस्ता, उल्हासनगर पोलीस ठाणे रस्ता, मध्यवर्ती रुग्णालयासमोरील रस्ता ही वाहतूककोंडीची नेहमीची ठिकाणे झाली आहेत.शहरातील वाहतुकीला शिस्त नसल्याने येथील पादचाºयांना ये-जा करताना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच आता हे वॉर्डन काढून घेतल्याने कोंडीमध्ये अधिकच भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.