शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार गावे अजूनही पुस्तकांपासून दूर

By admin | Updated: June 1, 2017 05:03 IST

ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही पुस्तक या शब्दापासून कोसो दूर असल्याची खंत ज्येष्ठ अभ्यासक, ग्रंथसखा श्याम जोशी यांनी व्यक्त केली. व्यास क्रिएशन्स आणि वंदे मातरम् संघ आयोजित पुस्तक आदानप्रदान महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. या वेळी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून जोशी बोलत होते. ते म्हणाले की, ग्रंथदान करणे ही सुसंस्कृत आणि सभ्यपणाची पहिली पायरी आहे. विकासकामे होत राहतात. समाज बदलत राहतो, तरीही मनुष्याचे जगण्याचे नेमके प्रयोजन काय, हे शिकवणारी प्रत्यक्ष कार्यशाळा म्हणजे हा ग्रंथांचा आदानप्रदान महोत्सव. व्यास क्रिएशन्सने आयोजित केलेला हा महोत्सव म्हणजे वाचन संस्कृती वाढवण्याच्या कार्यातील मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले. पुस्तक रद्दीमध्ये देणे, हे अमानुषपणाचे लक्षण आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांनी आपल्या मुलांसाठी आणलेली पुस्तके रद्दीत देणे, हे संवेदनाहीन समाजाचे लक्षण आहे. देशाचे पहिले कर्तव्य म्हणजे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक तयार करणे. हे कार्य केवळ ग्रंथवाचनाने होते. म्हणून, या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले. वंदे मातरम् संघाचे अध्यक्ष संदीप लेले म्हणाले की, प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक संपन्नता असतेच. परंतु, प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय असणे, ही खरी सुबत्ता आहे. घरातील एक खोली संस्कार म्हणून ग्रंथांसाठी ठेवावी. बांधकाम व्यावसायिकांनी अशी खास सोय करावी. या महोत्सवामुळे वाचन संस्कृती वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. या महोत्सवात रसिक वाचकांनी देणगी स्वरूपात दिलेली पुस्तके भिलार या पुस्तकांच्या गावाला लोकार्पण करण्यात येतील, असे व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड यांनी सांगितले. या वेळी ग्रंथप्रेमींनी काही पुस्तके प्रातिनिधिक स्वरूपात भिलार या पुस्तकांच्या गावाला देणगी स्वरूपात जोशी यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी समीक्षक श्रीराम बोरकर, नाटककार शशिकांत कोनकर, पत्रकार श्री.वा. नेर्लेकर उपस्थित होते.