शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बारावे भरावभूमी कंत्राटदाराचे ४४ लाख जप्त

By admin | Updated: July 26, 2016 04:50 IST

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करायचे असेल तर बारावे येथील क्षेपणभूमी विकसित करण्याची गरज आहे. मात्र आधी आधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी आलेल्या कंत्राटदाराने

- मुरलीधर भवार, कल्याण

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करायचे असेल तर बारावे येथील क्षेपणभूमी विकसित करण्याची गरज आहे. मात्र आधी आधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी आलेल्या कंत्राटदाराने माघार घेतल्यानंतर आता बारावेतील कंत्राटदारानेही माघार घेतली आहे. त्याची ४४ लाखांची अनामत रक्कम पालिकेने जप्त केली आहे. डम्पिंगच्या कामात होणारा राजकीय हस्तक्षेप, दबाव, नागरिकांची आंदोलने-निदर्शने आणि याचिकांच्या दडपणामुळे ही माघार घेतली गेल्याची चर्चा आहे. मात्र पालिकेतील एकही अधिकारी त्यावर स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही. आधारवाडीचे डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कंत्राटदाराला काम देण्यात आले होेते. त्याने कामही सुरु केले नाही. त्याची २२ लाखाची अनामत रक्कम पालिकेने महिनाभरापूर्वी जप्त केली. बारावे भरावभूमीच्या कामाचे कार्यादेश देऊनही कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नसल्याने त्याची ४४ लाखांची रक्कम जप्त झाली आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करुन बारावे येथे शास्त्रोक्त भरावभूमी तयार करण्याचे ठरले होते. त्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे काम २८ कोटींचे होते. हे डम्पिंग बंद झाल्यावर कचरा बारावे येथे टाकला जाणार होता. आधारवाडी डंपिंग ग्राऊंडमुळे नागरीक बेजार झालेले असतानाच बारावे येथे भरावभूमी तयार करण्यास तेथील २२ गृहसंकुलातील नागरिकांनी विरोध केला. त्यासाठी महापालिकेविरोधात मोर्चा काढला. नागरिकांचा विराध पाहून आधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी पुढे आलेल्या कंत्राटदाराने काढता पाय घेतला. त्याचीच पुनरावृत्ती बारावे भरावभूमीबाबतीत घडली. बारावेचे काम अग्रवाल सोल्यूशन कंपनीला देण्यात आले होते. ते काम सुरु करीत नसल्याने १ जूनपासून महापालिकेने दररोज एक हजार रुपये दंड ठोठावला. तसेच त्याला सात वेळा नोटीस बजावली. त्याला कंपनीने प्रतिसाद दिला नाही. अखेरीस कंपनीची अनामत जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले.फेरनिविदा आज : आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडप्रकरणी १६ जूनला कंत्राटदाराचे २२ लाख जप्त करुन कंत्राट रद्द करण्यात आले. आधारवाडी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी फेरनिविदा मागविण्यात आल्या आहेत. त्या उद्या, २६ जुलैला दुपारपर्यंत उघडल्या जाणार आहेत. ई टेंडरिंग असल्याने कोणत्या कंपन्या पुढे आल्या आहेत, याची माहिती अद्याप महापालिका प्रशासनास नसली तरी अ‍ॅन्थोनी, डेटाएक्स या कंपन्यांनी रस दाखविला होता. प्रत्यक्षात त्यांनी निविदा भरली की नाही हे उद्याच स्पष्ट होणार आहे. आधारवाडीपाठोपाठ आता बारावेसाठीही फेरनिविदा मागवावी लागणार आहे. बारावे परिसरातील रोसाली एनएक्स गृहसंकुलातील नागरिकांनी तेथील भरावभूमीला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात फेब्रुवारीमध्ये दाखल केली होती. तांत्रिक मुद्द्यामुळे न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली नव्हती. त्यांनी पुन्हा योग्यप्रकारे याचिका दाखल केल्यावर ती वेगळी याचिका म्हणून दाखल करून न घेता घनकचराप्रकरणी सुरु असलेल्या याचिकेत रोसालीला सबपार्टी म्हणून जोडून घेण्यात आले आहे. या मूळ याचिकेवर १६ आॅगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी १२ आॅगस्टच्या आत पालिकेने डम्पिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी काय कार्यवाही केली, याचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे.