शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेच्या व्यवहारात ४३.५० लाखांची फसवणूक

By admin | Updated: May 5, 2017 05:38 IST

फ्लॅटखरेदीच्या व्यवहारात ठाण्यातील एका इस्टेट एजंटची सुमारे ४३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस

ठाणे : फ्लॅटखरेदीच्या व्यवहारात ठाण्यातील एका इस्टेट एजंटची सुमारे ४३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कापूरबावडी पोलिसांनी ४ वर्षांनंतर गुन्हा दाखल केला.कापूरबावडी भागातील रहिवासी अवधेश सिंग यांचा पूर्वी जुन्या वाहनांच्या विक्रीचा व्यवसाय होता. यातूनच त्यांचा पोखरण रोडवरील सुशील टकारिया यांच्याशी परिचय झाला. आपणास फ्लॅट विकत घ्यायचा असल्याचे त्यांनी सुशील टकारिया यांना सांगितले. त्यानुसार, सुशील टकारिया यांनी अवधेश सिंग यांना हॅप्पी व्हॅली येथे राहणारे त्यांचे भाऊ, मे. टकारिया प्रॉपर्टीचे मालक अनिल टकारिया यांच्या भेटीसाठी नेले. अवधेश सिंग यांनी फ्लॅट विकत घेण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली असता, अनिल टकारिया यांनी १०८० चौरस फुटांच्या टू बीएचके फ्लॅटची माहिती दिली. हा फ्लॅट राबोडी भागातील प्रशांत तावडे यांनी सायन येथील उमेश पाटील यांच्या नावे खरेदी केला असून तो विकायचा असल्याचे अनिल टकारिया म्हणाले. त्या वेळी अनिल टकारियांसह उमेश पाटील, प्रशांत तावडे, सुशील टकारिया, निशांत तावडे आणि सायन येथील दिलेश शिवकर यांच्या उपस्थितीत ६ हजार ५०० रुपये प्रतिचौरस फूट याप्रमाणे फ्लॅटचा सौदा निश्चित करण्यात आला. फ्लॅटची नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या खर्चासह पार्किंगची किंमतही यामध्येच समाविष्ट होती. हा व्यवहार चितळसर येथील मे. अ‍ॅसेट कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे भूपेंद्र दोशी यांच्याशी होणार असल्याने अवधेश सिंग यांनी डिसेंबर २०११ ते जानेवारी २०१३ या काळात त्यांना धनादेश आणि रोख स्वरूपात ४३ लाख ५० हजार दिले. (प्रतिनिधी) न्यायालय आदेशाचे पालनयाप्रकरणी आरोपींवर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी अवधेश सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार कापूरबावडी पोलिसांनी भूपेंद्र दोशी, उमेश पाटील, दिलेश शिवकर, सुशील टकारिया, अनिल टकारिया, चंदन वाडेकर, प्रशांत तावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.