ठाणे : नौपाडा येथील सदनिका गहाण असतानाही तिचे नाहरकत प्रमाणपत्र न घेता समीर फणसेकर याच्यासह पाच जणांनी एका वित्त संस्थेकडून व्यवसायासाठी कर्ज काढून ४३ लाख १३ हजार ३८० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाण्याच्या पोखरण रोड क्रमांक -२ येथील रवी इस्टेटमधील एक कोटीच्या सदनिकेवर समीर आणि दीप्ती फणसेकर यांनी नौपाडा येथील एचडीबी फायनान्शिअल या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेकडून ५६ लाखांचे काही दिवसांपूर्वी कर्ज घेतले होते. त्यातील त्यांनी ३२ लाख रुपये भरले. त्यानंतर, अनिवासी भारतीय महादेव सिंग यांना त्यांनी गहाण ठेवलेली सदनिका ९५ लाखांना विकली. त्यानंतर, समीर आणि दीप्ती फणसेकर हे मात्र गायब झाले. पुढे हप्ते थकल्यामुळे वित्त संस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांनी या सदनिकेच्या मालकांना गाठले. तिथे महादेव सिंग यांनी भाडेकरू ठेवले होते. त्यांच्या चौकशीतूनच हा सदनिकाविक्रीचा आणि फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यात वित्त संस्थेची ४३ लाखांची फसवणूक
By admin | Updated: April 20, 2017 05:19 IST