शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
4
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
5
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
6
भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
7
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
8
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
9
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
10
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
11
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
12
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
13
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
14
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
15
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
16
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
17
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
18
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
19
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
20
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?

ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी ४२६ कोटी

By admin | Updated: May 4, 2017 05:57 IST

जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागाच्या सर्वांगिण विकासावर वर्षभरात ४२६ कोटी ७२ लाख रूपयांच्या खर्चाचे नियोजन

 ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागाच्या सर्वांगिण विकासावर वर्षभरात ४२६ कोटी ७२ लाख रूपयांच्या खर्चाचे नियोजन जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत होणार आहे. राज्य शासनाने या खर्चाचा नियतव्यय नुकताच मंजूर केला. या आर्थिक वर्षात (२०१७- १८) जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी ३०६ कोटी ७२ लाखांचा नियतव्यय जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत मंजूर झाला आहे. आदिवासी उपयोजने अंतर्गत १२० कोटींसह ४२६ कोटी ७२ लाखांचा नियतव्यय राज्य शासनाने मंजूर केला. या खर्चाच्या नियोजनाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. मागील वर्षी (२०१६ - १७) सर्वसाधारण अंतर्गत सुमारे २६६ कोटींचा नियतव्यय मजूर करण्यात आला होता. त्यात या वर्षी सुमारे ४६ कोटींची वाढ झाली आहे. शासनाने मंजूर केलेल्या ४२६ कोटींच्या या नियतव्ययास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांकडून विकास आराखडा तयार केला जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या डीपीसीमध्ये या आराखड्यास मंजुरी घेतली जाईल. यात कृषी, लघूपाटबंधारे, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते, बांधकाम, दिवाबत्ती, ग्राम विकास, परिवहन समाजिक सेवा इत्यादी कामांचा समावेश असेल. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हिजन डॉक्युमेंट !ठाणे : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे १५ वर्षांचे व्हिजन डॉक्युमेंट ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तयार करीत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांकडून त्यांच्या विविध योजनांची सविस्तर माहिती संकलित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात राबवण्यात येणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या दृष्टीने आढावा घेऊन जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना इत्थंभूत माहिती देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमणवारही उपस्थित होते. जिल्ह्यात होणाऱ्या विकासकामांतून ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावले पाहिजे तसेच मानव विकास निर्देशांकात सुधारणा झाली पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या व राज्यस्तरावरील कार्यालयांच्या विविध योजनांचा योग्य समन्वय करुन विशेषत: आदिवासी क्षेत्रात प्रभावीरीत्या योजना राबवण्यात याव्यात.केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मार्गदर्शनही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केले. या बैठकीसाठी उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख या बैठकीस उपस्थित होते.