शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

भिवंडीत ४२ जणांना मोक्का

By admin | Updated: April 27, 2017 23:38 IST

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनपाचा निवडणूक विभाग सज्ज झाला असल्याची माहिती आयुक्त योगेश म्हसे

भिवंडी : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनपाचा निवडणूक विभाग सज्ज झाला असल्याची माहिती आयुक्त योगेश म्हसे व पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. भिवंडीतील रक्तरंजित राजकीय इतिहास लक्षात घेऊन पोलिसांनी २६ गुंडांना तडीपार केले आहे, तर ४२ व्यक्तींवर मोक्काखाली कारवाई केली आहे. ९०० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.निवडणुकीत उमेदवारांनी आपले अर्ज आॅनलाइन भरण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मदतनीस उपलब्ध केला जाणार आहे. महानगरपालिकेची हीचौथी निवडणूक आहे. निवडणूक काळात लागणाऱ्या विविध परवानग्यांकरिता मनपाने एक खिडकी योजना योजना सुरू केली असून केवळ ४८ तासांत परवानग्या दिल्या जातील. निवडणूक प्रचारासाठी १४ वर्षांखालील मुलांचा तसेच प्राण्यांचा उपयोग करण्यास बंदी घातली आहे. उमेदवारांचे प्रचार कार्यालय सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे बंधन घातले आहे. शहरातील ६४४ मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वृद्ध, अंध, अपंग मतदार व गरोदर महिलांसाठी सोयीसुविधा करण्यात येणार आहेत. मागील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ४९.०६ एवढी होती. त्यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी यावेळी प्रयत्न केले जातील, असे आयुक्त म्हणाले. जास्त मतदान होण्यासाठी ठाणे व उल्हानगर मनपा निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदान करणाऱ्यांना मालमत्ताकरात सवलत देण्याचा निर्णय घेतला, तसाच तो भिवंडीतही घेण्यात येईल, असे म्हसे यांनी स्पष्ट केले. शहरात प्रवेशाच्या पाच ठिकाणी तपासणी केंद्रे स्थापन करून सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. आयकर, विक्रीकर, उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी तैनात असतील, असे त्यांनी सांगितले.उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, निवडणूक काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे, याकरिता २६ जणांना तडीपार केले आहे. ४२जणांवर मोक्का कायद्याद्वारे कारवाई केली आहे, तर ९००जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. निवडणूक काळात शहरात वाहनांच्या रॅलीस परवानगी देण्यात येणार नाही. वाहनांवर भोंगे लावता येणार नाहीत. (प्रतिनिधी)