शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पोलिसांसाठी बांधणार ४१२ घरे

By admin | Updated: April 14, 2017 03:18 IST

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान चांगले राहावे, या उद्देशाने सुसज्ज इमारतींसोबत मोकळी जागा

भिवंडी : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान चांगले राहावे, या उद्देशाने सुसज्ज इमारतींसोबत मोकळी जागा यासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे. पोलिसांसाठी ४१२ निवासस्थाने बनवण्यास मान्यता दिली असून ती बांधण्यासाठी ८ कोटी ९५ लाख मंजूर केले आहेत. या निवास्थानांमध्ये पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, १८ पोलीस निरीक्षक व ९ सहायक पोलीस निरीक्षक तसेच ३८१ पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. शहरात सुमारे ८०० पोलीस कर्मचारी काम करत असून भादवड व सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागील इमारतीत ५२० व २०० निवासस्थाने आहेत. परंतु, या ठिकाणी जागा अपुरी असल्याने काही वर्षांपूर्वी भादवड येथे २२० क्षेत्रफळाची ५२० निवासस्थाने बांधलेली आहेत. या निवासस्थानांतर्गत फेरफार करून ४५० क्षेत्रफळाची २६० निवासस्थाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर शहर पोलीस ठाणे, निजामपूर, भोईवाडा, नारपोली व शांतीनगर पोलीस ठाण्यांच्या नव्याने इमारती बांधण्यात येणार असून याचा प्रस्ताव मंजूर असून त्यावर लवकरच कार्यवाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भिवंडी शहर संवेदनशील असल्याने विविध सण आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी व अधिकारी येत असतात. त्या वेळी त्यांची सोय पोलीस नियंत्रण शेजारी असलेल्या गायकवाड इमारतीमध्ये केली जाते. या इमारतीत असुविधा आणि अस्वच्छ असल्याने बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास सहन करत राहावे लागते. तसेच ही इमारत जुनी झाल्याने महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. (प्रतिनिधी)