शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील ४० झाडे झाली खिळे, बॅनरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 00:28 IST

‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.

डोंबिवली : ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. ‘अंघोळीची गोळी’ संस्था पाणीबचत आणि वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे शाळा-महाविद्यालयांत याबाबत जागृतीके ली जाते. तसेच ‘खिळेमुक्त झाडे’ ही संकल्पना दोन वर्षांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात राबवली जात आहे. वृक्षसंवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे, त्यामुळे खिळेमुक्त झाडे हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा, असे आवाहन संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी यावेळी केले.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमध्ये राबवलेल्या उपक्रमात भूषण राजेशिर्के, चेतन म्हामुणकर, मंगेश तिवारी आदी युवकांनी सहभागी होत ४० झाडांवरील पोस्टर, बॅनर व खिळे काढले.यावेळी संस्थेचे सचिव अविनाश पाटील म्हणाले की, पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम यासारखे कायदे व नियम झाडांसंदर्भात आहेत. मात्र, ते पाळले जात नाहीत. त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. वृक्षसंवर्धनासाठी अनेक महानगरपालिकांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरा संरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे, असेही ते यावेळी म्हणाले.ठाण्यात स्वातंत्र्य दिन निसर्गासोबत साजरालॉकडाऊनमध्ये निसर्गातील झाडांनी, प्राणीपक्ष्यांनीही मोकळा श्वास घेतला. याच निसर्गाचे रक्षण केले तरच आपण भविष्यात अधिक मोकळा श्वास घेऊ शकू, हे लक्षात घेत मातृसेवा फाउंडेशनने स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण न करता उलट वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला.‘झाडे लावा, झाडे जगवा’ या मोहिमेंतर्गत ‘मातृसेवा’च्या कार्यकर्त्यांनी येऊर परिसरात शनिवारी वृक्षारोपण केले. अनेकदा वृक्षारोपण करण्यात येते. परंतु, त्या वृक्षांची पुढे निगा राखली जातेच, असे नाही.याच पार्श्वभूमीवर ‘मातृसेवा’च्या अध्यक्षा संध्या सावंत म्हणाल्या की, नुसते वृक्षारोपण करून दुर्लक्ष करू नये. झाडांची निगा राखणेही महत्त्वाचे आहे. जागेची पाहणी करून, पाण्याची सोय बघूनच आम्ही वृक्षारोपण करतो. प्रत्येक रोपाची वेळोवेळी पाहणी करून त्याची पुरेशी काळजी घेतो, त्याला खतपाणी घालतो. ठामपाच्या शाळांत जाऊन झाडांची ओळख, परसबाग, फुलपाखरू उद्यान असे उपक्र म राबवतो.