शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत ७८ पैकी ४० मराठी नगरसेवक

By admin | Updated: February 24, 2017 07:03 IST

महापालिकेच्या ७८ पैकी सर्वाधिक ४० मराठी, तर २८ सिंधी भाषिक नगरसेवक निवडून आले

सदानंद नाईक / उल्हासनगरमहापालिकेच्या ७८ पैकी सर्वाधिक ४० मराठी, तर २८ सिंधी भाषिक नगरसेवक निवडून आले. सिंधी समाजाचा टक्का घसरला असून मुस्लिम समाजाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पंजाबी ५, उत्तर भारतीय ३, तर एक बंगाली भाषिक नगरसेवक निवडून आला आहे. भाजपासह शिवसेनेने सिंधी भाषिक महापौराची हाक दिली होती. ती कितपत दोन्ही पक्ष पाळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिंधीबहुल शहर म्हणून उल्हासनगरची असणारी ओळख हळूहळू पुसली जात आहे. एकेकाळी फक्त सिंधी भाषिक नगराध्यक्ष असायचा. मराठी नगरसेवक बोटावर मोजण्याइतपत होते. आज परिस्थिती बदलली असून ७८ पैकी तब्बल ४० नगरसेवक मराठी भाषिक निवडून आले आहेत. तर, सिंधीबहुल शहरात सिंधी समाजाचे फक्त २८ नगरसेवक निवडून आले. सिंधीबहुल प्रभागातही मराठी नगरसेवक निवडून आल्याचे उघड झाले असून सिंधी समाज मतदान करण्यासाठी येत नसल्याचे मुख्य कारण पुढे येत आहे. शिवसेनेचे २५ पैकी २१ नगरसेवक मराठी असून ३ पंजाबी, तर एक उत्तर भारतीय आहे. भाजपा व ओमी टीमच्या ३२ पैकी १७ सिंधी भाषिक, तर ११ मराठी, पंजाबी २, उत्तर भारतीय व बंगाली प्रत्येकी एक नगरसेवक आहे. साई पक्षाचे ११ पैकी ९ सिंधी भाषिक, तर प्रत्येकी एक उत्तर भारतीय व मराठी भाषिक आहेत. राष्ट्रवादीच्या ४ पैकी २ सिंधी, एक मराठी व एक पंजाबी भाषिक आहे. काँग्रेस, भारिप, रिपाइं, पीआरपी यांचे सर्व नगरसेवक मराठी भाषिक आहेत. सिंधी महापौरावरून निवडणुकीपूर्वी शिवसेना व भाजपाने राजकारण खेळले असून ते खरोखरच सिंधी भाषिक महापौराला प्राध्यान्य देतात का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.