शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महिला बाल कल्याण योजनांसाठी ४० कोटींची भरीव तरतूद, प्रस्ताव महासभेच्या पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:57 IST

महिला बाल योजने अंतर्गत यंदा ४० कोटींची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहिला आणि मुलींसाठी भरीव योजनाआरोग्य विषयक सेवाही पुरविल्या जाणार

ठाणे - विविध योजनासंदर्भात तरतूद करण्यात आलेला महिला बाल कल्याण योजनांचा निधी मागील कित्येक वर्षे पडून राहत होता. यंदा मात्र पालिकेने हा निधी खर्ची करण्याचे निश्चित केले आहे. त्यातही दरवर्षी पेक्षा यंदा ४० कोटींची भरीव तरतूद विविध योजनांसाठी पालिकेने केली आहे. यामध्ये मुलींसाठी, महिलांसाठी, प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्य विषयक व आर्थिक स्वावलंबन कार्यक्रम आदींसह इतर विविध योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.                त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव १९ सप्टेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. यामध्ये सर्वांगीण विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रतिलाभार्थ्यांसाठी १० ते ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे. राजकन्या योजना, शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, ७० टक्क्यांपैक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या मुलींसाठी सहाय्य, पदवी परीक्षेत ६० टक्के व त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण मुलींसाठी आर्थिक सहाय्य अशा काही योजनांचा समावेश असून यासाठी १९८० लाभार्थी अपेक्षित धरण्यात आले आहेत. तसेच बालकल्याण कार्यक्रमाअंतर्गत १८० लाभार्थी अपेक्षित धरण्यात आले असून यामध्ये गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी मुलींना उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे. तर आरोग्यविषयक व आर्थिक स्वावलंबन कार्यक्रमाअंतर्गत विविध योजनांमधील २३२५ लाभार्थी अपेक्षित धरण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. तसेच प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाअंतर्गत बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन भरविणे, मुलींना व महिलांना व बचत गटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे आदींसह इतर योजनांमध्ये ९०० लाभार्थी अपेक्षित धरण्यात आले आहेत. विविध स्पर्धांचे आयोजन, जागतिक महिला दिन साजरा करणे आदींसाठीसुध्दा भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर स्वच्छता कार्यक्रमही या अंतर्गत घेण्यात आला असून यासाठीसुध्दा तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय या योजनेत २०१७-१८ मधील स्पील ओव्हर मधील योजनांचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार आता हे धोरण या योजनांचे धोरण महासभेच्या पटलावर मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त