शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन डम्पिंग मधील ९ लाख ९ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी ४० कोटी ६६ लाखांचा ठेका

By धीरज परब | Updated: March 21, 2023 16:58 IST

कचऱ्याच्या डोंगरा पासून होणाऱ्या जाचातून नागरिकांची होणार सुटका

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डंम्पिंग ग्राऊंडवर प्रक्रिया न करताच टाकला गेलेला आणि वर्षानुवर्षे साचून राहीलेल्या ९ लाख ९ हजार ६३० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ४० कोटी ६६ लाखांचा ठेका पालिकेने दिला आहे . त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या कचऱ्याच्या डोंगरास आग लागून होणाऱ्या सततच्या जाचातून लोकांची सुटका होणार अशी आशा आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी या बाबत माहिती देताना सांगितले की , उत्तन डम्पिंग येथे गेल्या अनेक वर्षां पासून साचून राहिलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांनी पुढाकार घेऊन निविदा प्रसिध्द केली होती.  

साचलेल्या कचऱ्याच्या डोंगरास सातत्याने आगी लागत असल्याने परिसरात प्रचंड घातक धुराचे प्रदूषण पसरत असते . शिवाय लिचेट मुळे शेतजमीन नापीक झाली आहे .  स्थानिकांनी तक्रारी , आंदोलने व आंदोलनाचे इशारे देणे , हरित लवाद व न्यायालयात याचिका करणे आदी पद्धतीने ह्या डम्पिंग चा विरोध चालवला आहे . 

डम्पिंग वर उर्वरीत शिल्लक असलेल्या घनकचऱ्याचे मोजमाप हे पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग यांच्या कडून प्रमाणित करून घेण्यात आले होते . १० ऑगस्ट २०२२ च्या पत्रा नुसार राज्य शासनाने साचलेल्या ९ लाख ९ हजार ६३० मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग साठी ४० कोटी ६६ लाखांच्या खर्चास मान्यता दिली होती . 

त्या कामासाठी आता मे. ई.बी. एन्वायरो बायोटेक प्रा. लि.  ह्या ठेकेदार कंपनीस कार्यादेश देण्यात आला आहे . या बायोमायनिंग कामास सुरुवात करण्यात आली आहे .  सदर कामाची मुदत २१ जून २०२४ पर्यंत असली तरी  यंदाचा पावसाळा सुरु होण्यापुर्वी हे काम संपवण्यासाठी आयुक्त यांनी कंत्राटदाराला आदेशित केले आहे.  

कंत्राटदार बायोमायनिंग म्हणजे वर्षानुवर्षे साचुन राहीलेला कचरा चाळणी करुन त्यातील खत वेगळे करणे आणि प्लास्टीक मटेरीयल व इतर वस्तु वेगळया करुन त्या प्रक्रियेसाठी पाठविल्या जातील .  त्यातील न कुजणारे ज्वलनशिल पदार्थ आरडीएफ या स्वरुपात जवळपासच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये इंधन म्हणुन वापरले जाईल.   पावसाळ्यापुर्वी सदर काम पुर्ण झाले तर उत्तन येथील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.