शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून ४०-६० चा फॉर्म्युला

By admin | Updated: February 1, 2017 03:28 IST

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला ४० टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६० टक्के जागा सोडण्याबाबतचा प्रस्ताव उभय पक्षांतर्फे प्रदेश पातळीवर धाडण्यात आला असून

- पंकज पाटील,  उल्हासनगर

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला ४० टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६० टक्के जागा सोडण्याबाबतचा प्रस्ताव उभय पक्षांतर्फे प्रदेश पातळीवर धाडण्यात आला असून आता यावर राज्यातील नेते चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. टीम ओमीच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली आहे. आतापर्यंत स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीला वरिष्ठांकडून आदेश मिळताच काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात चाचपणी करण्यात आली. काँग्रेसच्या नेत्यांनी देखील राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा करावी, असे संकेत दिले आहेत. टीम ओमी ही राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर राष्ट्रवादीची काय अवस्था होणार याची कल्पना त्यांच्या नेत्यांना आली आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशांचे पालन करण्याचे जिल्ह्यातील नेत्यांनी ठरवले आहे. काँग्रेसने एकूण जागांच्या ४० टक्के जागा सोडण्याचा आणि राष्ट्रवादीने ६० टक्के जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पक्षाचे किती नगरसेवक कलानी यांच्यासोबत जातात हे पाहिल्यावर जागावाटपात फेरबदल होऊ शकतो, असे काँग्रेसचे मत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याने दोन्ही पक्षांनी आघाडीचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी गेल्या निवडणुकीत आघाडी केलेली होती. या निवडणुकीतही आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. वरिष्ठांनी देखील त्या संदर्भात चाचपणी करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत परिणामकारक निर्णय हाती येतील. - जयराम लुल्ला,उल्हासनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उल्हासनगरातील आघाडीच्या चर्चेवर लक्ष ठेऊन आहेत. चर्चेचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येत आहे. आघाडी व्हावी ही नेत्यांनी इच्छा आहे. - निलेश पेढारी, काँग्रेसचे प्रभारी, उल्हासनगर.काँग्रेसकडून जागावाटपाचा प्राथमिक प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आला आहे. विद्यमान नगरसेवकांच्या जागा सोडून उर्वरित जागांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहे. -प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस