शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दररोज ३७ टन प्लास्टिक कचरा

By सदानंद नाईक | Updated: March 5, 2024 21:47 IST

प्लास्टिक पिशवी बंदी कागदावर?

उल्हासनगर : शहरात दररोज ३७ टन प्लास्टिक कचरा निघत असल्याने, महापालिकेच्या प्लास्टिक बंदीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभागाने वर्षभरात प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या १३९ जणांवर कारवाई करीत ७ लाखाचा दंड वसूल केला. तर २ हजार १९१ किलो प्लस्टिक पिशव्या जप्त केल्याची माहिती सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली. 

उल्हासनगर शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी महापालिकेने दामदुप्पट किंमतीला कचरा उचलण्याचा ठेका खाजगी कंपनीला दिला आहे. शहरातून दैनंदिन एकून ३६० टन कचरा उचलला जात असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली. एकून ३६० टन कचऱ्या पैकी प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण तब्बल ३७ टन असल्याचे उघड झाले आहे. याचाच अर्थ शहरात प्लास्टिक पिशव्याचा सर्रासपणे वापर होत असल्याचे उघड झाले. दैनंदिन एकून ३६० टन कचऱ्या पैकी ३७ टन कचरा प्लास्टिक पिशव्याचा असून वेस्टज पेपर २७.२२ टन, काचेचा ७.३४ टन, लेदर व रबर ५.३२ टन, इतर प्लास्टिक पॅकेजिंग कचरा ३.४८ टन, कपडे ४.८३ टन, खराब झालेले अन्न ५०.५४ टन, लाकूड ४.९७ तर इतर कचऱ्याचे प्रमाण १५ टन आहे. 

उल्हासनगरात सर्वाधिक प्लास्टिक पिशव्या बनविण्याचे कारखाने असून असे कारखाने चोरून सुरू आहेत. यामध्ये राजकीय पक्षाचे काही नेते, व्यापारी व महापालिका अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे. तर पाँकिंग प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या काही कारखान्याला महापालिकेने अटी शर्तीवर परवानगी दिली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. महापालिका आरोग्य विभागाने गेल्या वर्षात १३९ जणांवर प्लास्टिक पिशव्या बाळगल्या प्रकरणी कारवाई करीत, तब्बल ७ लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच २ हजार १९१ किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.  डम्पिंगच्या आगीच्या धुराने नागरिक हैराण शहरातून दैनंदिन एकून ३६० टन कचऱ्या पैकी २०० टन ओल्या कचऱ्याचे प्रमाण आहे. तर ३७ टन प्लास्टिक पिशव्याचा कचरा असून २७.२२ टन वेस्टज पेपर, कपडे-चिंध्या ४.८३ टन, लाकडी कचरा ४.९७ टन निघत आहे. या कचऱ्यामुळे डम्पिंग ग्राऊंडला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर