शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गुढी पाडव्यानिमित्त ३६८ व्या कट्टा उजळला रोषणाईने, अभिनय कट्टयावर आगळावेगळा दीपोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:29 IST

 अभिनय कट्टयावर  ठाण्यातील दिवंगत धर्मवीर आनंद दिघे, रामभाऊ म्हाळगी ,  डॉ वा. ना. बेडेकर  , खंडू रांगणेकर  ,  राम मराठे    ,मुग्धा चिटणीस   , पांडुरंगशास्त्री आठवले  ,   चंदू पारखी  ,  पी. सावळाराम यांना नववर्षाच्या सुरुवातीलाच दीपोत्सवाने वंदन करण्यात आले. 

ठळक मुद्देअभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी साजरा केलेल्या दीपोत्सवामुळे ठाण्यातील संध्याकाळ नयनरम्यगुढी पाडव्यानिमित्त ३६८ व्या कट्टा उजळला रोषणाईने ठाण्यातील ९ विविध क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींच्या नावे दिवा लावून दीपोत्सवाची सुरुवात

ठाणे : गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणार सण अर्थात मराठी नववर्षारंभ. यानिमित्ताने अनेक ठिकाणी शोभा यात्रांनी सुरू झालेली पाडव्याची पहाट, मराठी नववर्षाची शोभा वाढवत होती आणि ठाण्यातील  संध्याकाळ सुद्धा नयनरम्यय झाली होती ती म्हणजे अभिनय कट्ट्याच्या  कलाकारांनी साजरा केलेल्या दीपोत्सवामुळे. 

     ३६८ व्या कट्ट्याची सुरवात ही प्रथेप्रमाणे प्रार्थनेने झाली आणि.इतनी शक्ती हमे देना दाता चे स्वर आसमंतात दरवळले आणि प्रसन्नमय वातावरणात कार्यक्रमास आरंभ झाला. सर्व प्रथम अभिनय कट्टयावर नव्याने सुरू झालेल्या संगीत कट्ट्याच्या कलाकारांनी आपल्या गाण्यांद्वारे ही प्रसन्नता अबाधित राखली ज्या मध्ये विनोद पवार यांनी विठू माऊली तर निशा पांचाळ यांनी ऐरणीच्या देवा तुला हे गाणं गाऊन रसिकांची मने जिंकली. ज्ञानेश्वर मराठे यांनी गायलेले देहाची तिजोरी या गाण्याने वातावरण भक्तीमय केले पाडव्याच्या शुभेच्छा देत राजू पांचाळ यांनी शोधिसी मानवा हे गाणं गायले.पुढे संगीत कट्ट्याचा कलाकार प्रणव कोळी यांनी गिटार च्या सोबतीने मन उधाण वाऱ्याचे हे मनाला भिडणारे गाणे पेश करून रसिकांच्या काळजात घर केले. गिटार वरच्या त्याच्या अदाकारीला प्रेक्षकांनी भरघोस टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. यानंतर पाडव्याच्या निमित्ताने आयोजित दीपोत्सवास सुरवात झाली. तत्पूर्वी या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची होती ते कट्ट्याचे अध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत  येणारे संपूर्ण वर्ष हे या दिव्यांप्रमाणेच तेजोमय असायला हवे अशी प्रार्थना रंगदेवते चरणी केली आणि सर्वांच्याच निरोगी आयुष्याची मागणी विधात्याकडे करत उपस्थितांना पाडव्याच्या गोड शुभेच्छा दिल्या. राम वनवासातून आल्या नंतर गुढ्या उभारल्या गेल्याची कथा आपल्याकडे ऐकावयास मिळते. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर किरण नाकती यांच्या संकल्पेनुसार ठाण्यातील ९ विविध क्षेत्रातील दिवंगत थोर व्यक्तींच्या नावे एकेक दिवा लावून दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. परंतु या प्रत्येकाच्या नावे लावण्यात आलेला प्रत्येक दिवा आपल्या बालकलाकारांनी साकारलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेमार्फत लावण्यात आला. प्रभु श्रीरामचंद्र  (श्रेयस) यांनी  धर्मवीर आनंद दिघे , लक्ष्मण (अखिलेश जाधव) यांनी  रामभाऊ म्हाळगी , सीता (पूर्वा)यांनी  डॉ वा. ना. बेडेकर  , हनुमान(अद्वैत )याने खंडू रांगणेकर  , भगत सिंग ( निमिष भगत) यांनी राम मराठे    ,झाशीची राणी (सानवी)  यांनी  मुग्धा चिटणीस   , गाडगे बाबा (निमिष) यांनी  पांडुरंगशास्त्री आठवले  , तुकाराम महाराज(चिन्मय)यांनी  चंदू पारखी  , सिंधुताई सकपाळ (प्रांजल धरला) यांनी  पी. सावळाराम यांच्या नावे दीपप्रज्वलन करून यांच्या कार्याचा दीपोत्सवाच्या माध्यमातून सन्मान केला. रंगमंचावरील प्रमुख दीप प्रज्वलन पार पडल्या नंतर कट्ट्याच्या परिसरात मांडले गेलेले सर्वच दिवे हे उपस्थित रसिकांनी प्रज्वलित केले आणि या दीपोत्सवात हिरीरीने शामिल झाले. असंख्य दिव्यांच्या या प्रकाशमय वातावरणात कट्ट्याचा परिसर उजळून निघाला. आणि याच प्रसंगावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा कलाकार वीणा छत्रे हिने लीलया पार पडली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई