शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

३६५ महिलांची देहविक्रयातून सुटका

By admin | Updated: July 20, 2015 03:22 IST

लग्नाचे व पैशांचे आमिष, प्रेमजाळ्यात ओढून महिलांना देहविक्रीस भाग पाडले जाते. अशा प्रकारे त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्यांवर कारवाईसाठी

लग्नाचे व पैशांचे आमिष, प्रेमजाळ्यात ओढून महिलांना देहविक्रीस भाग पाडले जाते. अशा प्रकारे त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्यांवर कारवाईसाठी ठाणे पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभाग सुरू केला आहे. या विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पिटा अ‍ॅक्टनुसार कारवाईस सुरुवात केली आहे. गेल्या साडेतीन वर्षांत ६३ कारवाया करून सुमारे २१४ पुरुष आणि महिला आरोपींना अटक करून ३६५ पीडित महिलांची सुटका केली आहे. सर्वाधिक पीडित १२० महिलांची सुटका २०१४ मध्ये केलेल्या १६ कारवायांत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातून मुक्तता केलेल्या महिलांना एकतर सुधारगृहात पाठविण्यात येते किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाते. या महिलांना पैशांचे आमिष दाखवून किंवा ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते. पीडित महिला या प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले आहे.वेश्या व्यवसायासाठी आता व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराबरोबर भाड्याच्या रूमही वापरल्या जात आहेत. त्यामुळे भाड्याने घर देणाऱ्यांनी तेथे काय चालते, याची पाहणी करावी. हा व्यवसाय करून घेणाऱ्या २३ महिलांना यंदा पकडले आहे. - शकील शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक विभाग, ठाणेजाहिराती देऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्यांनी आता चक्क व्हॉट्सअ‍ॅपचा आसरा घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या व्यवसायाकडे महिलांना ओढण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविणाऱ्या २१४ जणांच्या पोलिसांनी मागील साडेतीन वर्षांत मुसक्या आवळल्या असून त्यामध्ये ४८ महिलांचाही समावेश आहे. यातून ३६५ पीडित महिलांची सुटका केली आहे. सद्य:स्थितीत भाड्याच्या रूमचाही या व्यवसायासाठी वापर होत असल्याने आपली रूम भाड्याने देणाऱ्यांनी तेथे काय चालते, याची तपासणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संकलन : पंकज रोडेकर