शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

३५० कोटींच्या विकासकामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 04:22 IST

शहरातील तब्बल ३५० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्त्विक मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी सभापती जया माखिजा, आयुक्त गणेश पाटील यांच्यासह एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

उल्हासनगर : शहरातील तब्बल ३५० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्त्विक मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी सभापती जया माखिजा, आयुक्त गणेश पाटील यांच्यासह एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी पक्षातील ओमी टीमला भाजपाने जाणीवपूर्वक लांब ठेवले आहे. दरम्यान, महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता असून महाआघाडीतील ओमी टीमचे पदाधिकारी व नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गैरहजर होते. या प्रकाराने पुन्हा महापालिका सत्तांतराच्या चर्चेला ऊत आला आहे.उल्हासनगरातील विकासकामांबाबत महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दुपारी अडीच वाजता बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला एमएमआरडीएचे अधिकारीदेखील उपस्थित होते. रस्ते विकासासाठी विशेष निधी, कबरस्तान, बोट क्लबचा विकास, ४००० ते ५००० चौ. मीटरवरील जागेला क्लस्टर योजना, बॅरेक आणि झोपडपट्टीतील घरांची १८ फूट उंची, अंबरनाथ-कल्याण रस्त्याचा विकास, रुंदीकरणातील व्यापाऱ्यांना पर्यायी जागा, उद्यानाचा विकास, धोकादायक इमारती आदी कामांची चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झाली.यावेळी महापौर आयलानी आणि आयुक्त गणेश पाटील यांनी अनेक समस्या मांडल्या. महापालिका निवडणुकीदरम्यान विशेष निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार, बैठकीतील विविध विकासकामांसाठी तब्बल ३५० कोटींच्या कामाला तात्त्विक मंजुरी दिल्याची माहिती महापौरांनी शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपाचे माजी आमदार आणि शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, प्रकाश माखिजा, मनोज लासी यांच्यासह महापालिका विभागप्रमुख, नगरसेवक आदी उपस्थित होते.>ओमी टीम भाजपाच्या टार्गेटवरमहापालिकेत ओमी टीमच्या महाआघाडीने भाजपा सत्तेत बसली. मात्र, वर्षभरात दोघांत वाद निर्माण झाल्याने भाजपाने ओमी टीमला सत्तेपासून दूर ठेवण्याचा अंतर्गत निर्णय घेतला आहे. त्यातूनच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला ओमी टीमच्या सदस्यांना जाणीवपूर्वक आमंत्रण देण्याचे टाळण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. महापौरपदासह आमदारपदापासूनही ओमी टीमला दूर ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याची प्रतिक्रिीया भाजपा पदाधिकाºयांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे.