शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक फ्रेंण्ड रिक्वेस्टद्वारे ३५ हजारांची फसवणूक

By admin | Updated: December 22, 2016 05:58 IST

सोशल मीडियावरील फेसबुकद्वारे एका महिलेची मैत्री (फ्रेण्ड रिक्वेस्ट) स्वीकारणे खारेगावातील श्रमिष्ठा नागले (४५) या महिलेला

ठाणे : सोशल मीडियावरील फेसबुकद्वारे एका महिलेची मैत्री (फ्रेण्ड रिक्वेस्ट) स्वीकारणे खारेगावातील श्रमिष्ठा नागले (४५) या महिलेला चांगलेच महागात पडले. आधी मैत्रीचे नाटक करून मार्स खान डेव्हिड फोन्गलोसा, रालटे आणि एरिक मायकल या तिघांनी पार्सलद्वारे गिफ्ट पाठवण्याचा बहाणा करून तिच्याकडून ३५ हजार रुपये उकळले. आणखी ९३ हजार रुपये उकळण्याच्या तयारीत असतानाच सावध झाल्याने कळवा पोलीस ठाण्यात तिने फसवणुकीची तक्रार दाखल केली.कळवा, खारेगाव येथील कार्तिक व्हिला सोसायटीमध्ये राहणाऱ्या श्रमिष्ठा यांना एरिक मायकल याने मार्स खान डेव्हिड फोन्गलोसा तसेच रालटे यांच्याशी संगनमत करून एरिकच्या फेसबुक अकाउंटवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. समोरची व्यक्ती उच्चशिक्षित महिला असल्याचे भासवल्यामुळे तिच्याशी मैत्री स्वीकारून त्यांनी गप्पा सुरू केल्या. नंतर, व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅटिंग सुरू करून त्यांचा विश्वास संपादन केला. आता तुम्हाला मोठ्या रकमेचे ४५ किलोग्रॅम वजनाचे गिफ्ट पार्सल पाठवत असल्याची त्या महिलेचा मित्र एरिकने बतावणी केली. त्यासाठी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे पार्सलच्या क्लिअरिंगसाठी ३५ हजार डेव्हिड यांच्या दिल्ली येथील बँक खात्यात भरण्यास सांगितले. खात्यावर पैसे भरल्यानंतर पार्सल मिळेल, असे आमिष दाखवल्यामुळे त्यांनी ते भरले. हे पैसे भरल्यानंतर अ‍ॅण्टी टेररिस्ट सर्टिफिकेटसाठी ९३ हजार रुपये भरावे लागणार असल्याचे रालटे याने सांगितले. अर्थात, त्यांना कोणतेही पार्सल न देता त्यांची फसवणूक केली. (प्रतिनिधी)