शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदानातून ३४७ जणांना दृष्टी

By admin | Updated: June 17, 2017 01:33 IST

शासनाने दिलेल्या नेत्रदानाच्या टार्गेटपेक्षा यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून दुप्पटीने नेत्रदान झाल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे २००६-१७ या वर्षात ३४७ जणांना दृष्टी

- पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शासनाने दिलेल्या नेत्रदानाच्या टार्गेटपेक्षा यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून दुप्पटीने नेत्रदान झाल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे २००६-१७ या वर्षात ३४७ जणांना दृष्टी मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्रदान विभागाने दिली.दरवर्षी शासनाकडून नेत्रदानाबाबत प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट दिले जाते. त्याच प्रमाणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही २०१६-१७ या वर्षाकरीता चारशेचे टार्गेट दिले होते. त्यानुसार,या दोन्ही जिल्ह्यातून एकूण ७८६ जणांनी नेत्रदान केले होते. त्यामुळे यंदा नेत्रदानाचे टार्गेट दुप्पटीने वाढल्याचे नेत्रदान विभागाकडून सांगण्यात आले. तर एवढ्या मोठ्याप्रमाणात नेत्रदान झाल्याने त्यातील सर्व नेत्र उपयुक्त ठरले नसले तरी, त्यातील उपयुक्त असलेले नेत्र हे प्रतिक्षा यादीतील ३४७ व्यक्तींना लाभल्याने त्यांना दृष्टी मिळाली आहे.अशाप्रकारे ठाणे, मुंबईतील लोकांना दृष्टी मिळाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. शासनाच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदानाबाबत दोन्ही जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.सी. केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्याप्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात नेत्रदानाची चळवळ उभी राहिल्याचे बोलले जात आहे. तसेच नेत्रदान होणाऱ्या प्रत्येक नेत्राची सखोल तपासणी केली जाते. ही तपासणी करताना, ते नेत्र खरोखरच कोणाच्या उपयुक्त आहेत का? तसेच नेत्रदान करणाऱ्या दात्याला कोणता गांभीर आजार होता का? हे प्रामुख्याने पाहिले जाते. त्यानंतर नेत्ररोपण करण्यासाठी ते नेत्र संबंधित सामाजिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालय,रुग्णालय येथे पाठवले जाते. उर्वरित नेत्र वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाठवले जाते. तर नेत्रदान करणाऱ्यांमध्ये एखादा एचआयव्ही रुग्ण असण्याची शक्यता असल्याने ही तपासणी करून त्याबाबत काळजी घेतली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.‘‘ यंदा ७८६ जणांना नेत्रदान केले आहे. त्यामुळे ३४७ जणांना दृष्टी मिळाली आहे. याबाबत राबविण्यात आलेल्या जनजागृतीचे हे फलीत असल्याचे दिसते.’’ - डॉ. पी.के.देशमुख, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक, ठाणे.