शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘टेलिमानस’मध्ये उदासीनतेच्या ३३,६१० तक्रारी; ८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या सर्वाधिक समस्या

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 22, 2024 11:19 IST

मानसिक त्रासाची जवळपास १७ कारणे सांगितली जात आहेत. 

ठाणे : मानसिक आजाराविषयी २४*७ ऑडिओद्वारे समुपदेशन करणाऱ्या टेलिमानसमध्ये दोन वर्षांत ३३,६१० व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. यात मनाची उदासीनता किंवा मूड खराब असणे या समस्या सर्वाधिक सांगितल्या जात आहेत. १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील व्यक्ती सर्वाधिक समस्या सांगत असल्याचे निरीक्षण ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने नोंदविले आहे. मानसिक त्रासाची जवळपास १७ कारणे सांगितली जात आहेत. 

नैराश्य, चिंता, सतत होणारा मानसिक त्रास व्यक्तींनी बोलून दाखवावा, त्रास मनात साठवून न ठेवता त्यांनी व्यक्त व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारने टेलिमानसची स्थापना केली. यात महाराष्ट्रात प्रथमच ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात टेलिमानस सुरू झाले आहे. या दोन वर्षांत ३३,६१० व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्याचे निदर्शनास आले. मनाची उदासीनता, प्रेमभंग, परीक्षेची चिंता, बेरोजगारी, पगार कमी असणे, ताणतणाव यांसारख्या अनेक मानसिक त्रासाची कारणे या व्यक्तींकडून सांगण्यात आली आहेत. दिवसाला अंदाजे ४५ कॉल्स टेलिमानसवर येतात. विशेषत: शहरी भागांतून सर्वाधिक कॉल्स येतात.

समस्या 

मनाची उदासीनता ताणतणाव झोप न येणे  चिंता झोप कमी होणेआक्रमक होणेकौटुंबिक वादनात्यात समस्या असणेव्यसन असणे आरोग्य विषयक समस्यापरीक्षा किंवा अभ्यासाची चिंता

वयोगट     कॉलची टक्केवारी  जाणवणाऱ्या समस्या१८ ते ४५ वर्षे     ७२.७ टक्के          विवाह किंवा इतर नात्यात समस्या,             नोकरीत मानसिक त्रास जाणवणे.४६ ते ६४ वर्षे     १६ टक्के         रात्री झोप येत नाही किंवा निवृत्तीनंतर             चिंता सतावणे१३ ते १७ वर्षे     ५.२ टक्के         परीक्षेची चिंता सतावणे६५ वर्षांवरील     ४.८ टक्के         झोपेचा त्रास ० ते १२ वर्षे     १.२ टक्के         अस्थिर असलेल्या बालकाशी कसे             वागावे, मुले अभ्यास करत नाही.             

मानसिक विकलांग मुलांशी कसे वागावे?

देशभरातील कोणत्याही व्यक्तीला मानसिक त्रास जाणवत असेल, त्यांनी १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा. टेलिमानससाठी एका शिफ्टला ४ ते ८ समुपदेशक असतात. ते समोरच्या व्यक्तीची समस्या जाणून त्याप्रमाणे त्याचे समुपदेशन करतात. आम्ही यात त्या व्यक्तीची गोपनीयता ठेवतो. कोणालाही मानसिक आजाराची सौम्य किंवा मध्यम लक्षणे जाणवत असतील किंवा मानसिक त्रास असेल ते या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन करू शकतात. - डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधिक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय

टॅग्स :thaneठाणे