शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
3
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
4
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
5
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
6
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
7
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
8
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
9
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
10
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
11
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
12
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
13
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
14
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
15
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
16
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
17
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
18
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
19
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

कोरोनाशी लढा देणारा ६५ वर्षीय योध्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 15:23 IST

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा जीवापाड मेहनत घेत आहेत, तर पोलीस यंत्रणा देखील यासाठी २४ तास सक्रीय असल्याचे दिसत आहे. परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोपरीतील ६५ वर्षीय वृध्द देखील लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत आहे.

ठाणे : पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरून थेट कोरोनाच्या संकटाशी युद्ध करीत आहे. २४ तास त्यांचा रस्त्यावर पहारा आहे. अशा प्रसंगी कोपरितील एक ६५ वर्षीय पोलीस मित्र देखील पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून या युद्धात उतरला आहे. पोलीस सांगतील त्या ठिकाणी हा पोलीस मित्र गळ्यात मेगा फोन आणि हातात जनजागृतीची पत्रके घेऊन लोकांना सावधानतेचा इशारा देत आहे. अडचणीत असलेल्या कुटुंबाला पोलिसांकडून मदत पोहचवीत आहे.             कोपरीतील श्रमदान सोसायटीत राहणारे शंकर बुकाने हे आंबेडकरी चळवळीतील सक्रीय समाजसेवक आहेत. अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असल्याचे ते मानतात. कोपरीतील सगळ्या समाजकार्यात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे पोलिसांच्या शांतता मोहल्ला कमिटीवर ते कार्यरत आहेत. पोलीस मित्र म्हणून ते काम पाहतात. सध्या कोरोनाच्या पाशर््वभूमीवर राज्यात मोठे संकट उभे राहिले आहे. ठाण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोपरीत या आजाराचा संसर्ग पसरू नये म्हणून इथली पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून नागरिकांना रस्त्यावर येण्यास मनाई करत आहेत. नाकाबंदी करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कामात अनेक सामाजिक संघटना-व्यक्तींचा वाटा आहे. पोलीस मित्र असलेले शंकर बुकाने देखील मागे नाहीत. राज्यात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून बुकाने वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन जागृतीचे काम करत आहेत. पोलिसांच्या सूचना - नियमांना लोकांपर्यंत पोहचवीत आहेत. बाजारात फिरून मेगा फोनवरून जनतेला सूचना देत आहेत. जनजागृती आणि पोलिसांच्या सूचनांची पत्रके लोकांना वाटत आहेत. या वयातही चालत जाऊन वस्त्यांमधील लोकांना शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देत आहेत. अनेकदा ते एकटेच मेगा फोन गळयात अडकवून लोकांना विविध संदेश देण्याचे काम करतात. अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर आलेल्या लोकांना सुरक्षित अंतर ठेवण्याची विनंती करतात. भाजीपाला बाजार, किराणा दुकानांसमोर होणाºया गर्दीला शिस्त लावण्याचे काम करतात.

  • पोलिसांनी योग्यवेळी योग्य खबरदारी घेतल्याने कोपरी ग्रीन झोनमध्ये आहे. राज्यात संचारबंदी आणि देशात लॉक डाऊन सुरू होताच कोपरी पोलिसांनी पहिल्या दिवसापासूनच चोख बंदोबस्त लावून लोकांना घराबाहेर पडू दिले नाही. अत्यावश्यक वस्तूंच्या दुकांनदारांनाही शिस्त लावण्याचे काम केले. भाजी बाजार आणि अत्यावश्यक वस्तूंची बेशीस्त विक्र ी होऊ दिली नाही. बाजारांचे योग्य नियोजन केले. त्यामुळे कोपरी कोरोनामुक्त ठेवण्यात पोलिसांची महत्वाची भूमिका आहे. आपले कर्तव्य आहे म्हणून मी सुद्धा जनसेवा करतो आहे.

- शंकर बुकाने, पोलीस मित्र 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या