शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१५ हजार दिवेकर जाणार अनारोग्याच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:32 IST

बेकायदा डम्पिंग अधिकृत करणार; हरितपट्ट्याचे आरक्षण बदलण्याच्या हालचाली

ठाणे : ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड आता अधिकृत करण्याच्या हालचाली सुरूकेल्या असून त्यासंदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. या डम्पिंगमुळे येथील १५ हजार रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच येथील रहिवास आणि हरितक्षेत्र बदलण्याचा घाट या माध्यमातून घातला आहे.महापालिका सध्या दिव्यातील खाजगी जागेवर शहरातील ७५० मेट्रिक टन कचरा टाकत आहे. यामुळे पसरणाºया दुर्गंधीमुळे रहिवासी हैराण झाले आहे. याशिवाय, येथील कचºयाला वारंवार आगी लागत असल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे ते हटविण्याच्या मागणीसाठी विविध आंदोलनेदेखील झाली आहेत. विशेष म्हणजे ते बंद करण्याचे आश्वासनही पालिकेने अनेकवेळा दिले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यातही प्रत्येक निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न गाजत आहे. परंतु, ते बंद करण्याऐवजी आता अधिकृत करण्याच्या पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. डावले, देसाई, साबे आणि दिवा या भागातील भूखंडावर घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदलाचा प्रस्ताव महासभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या नाहीतर आयुक्तांच्या स्तरावर निर्णय घेऊन प्रस्ताव शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यास आयुक्तांना प्राधिकृत करण्यास मान्यता मिळावी, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. याचाच अर्थ नागरिकांनी विरोध केला तरी या भागात डम्पिंग होणार हे आता पालिकेनेच निश्चित केले आहे.प्राणवायू देणाºया हरितपट्ट्यावर टाकणार कचराडावले येथील सर्व्हे क्र मांक २११, २१२, देसाई येथील सर्व्हे क्र मांक २२३, २२४ आणि दिवा येथील सर्व्हे क्र मांक ७९ येथील भूखंडावर हरित विभाग असे आरक्षण आहे. साबे येथील सर्व्हे क्र मांक ३७, ५७, ५८, ५९, ६०, ७२ या भूखंडांवर हरित विभाग असे आरक्षण आहे, तर साबे येथील सर्व्हे क्र मांक ३८, ६१ या भूखंडावर रहिवास आणि हरित विभाग असे आरक्षण आहे.सद्य:स्थितीत या भूखंडांवर डम्पिंग असून त्याठिकाणी शहराचा कचरा टाकण्यात येतो. त्याची विल्हेवाट जैविक पद्धतीने शास्त्रीयदृष्ट्या पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रशासनाने या भूखंडावर आता घनकचरा व्यवस्थापन असे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मंगळवारी होणाºया महासभेपुढे तो मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यास स्थानिकांनी विरोध केला असून त्यासाठी महापालिकेकडे निवेदन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :dumpingकचरा