शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मोबाइल टॉवर कंपन्यांकडे ११३ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:53 IST

केडीएमसी वसुलीसाठी नेमणार ठेकेदार; ३८७ टॉवर बेकायदा

- मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ४८२ मोबाइल टॉवर आहेत. मात्र, मोबाइल टॉवर कंपन्या महापालिकेला मालमत्ताकर भरण्यास टाळाटाळ करत असल्याने ही थकबाकी ११२ कोटी ८३ लाखांवर पोहोचली आहे. ही थकबाकी वसुलीसाठी पालिकेने खाजगी ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा काढली आहे. कंपन्या अरेरावी करत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.यंदा कल्याण-डोंबिवली महापालिकेने ४५० कोटींच्या करवसुलीचे लक्ष्य निश्चित केले आहे. टॉवर कंपन्यांकडून वसुली झाल्यास हे लक्ष्य गाठण्यास मोठा हातभार लागेल. कर थकवल्यामुळे यापूर्वी महापालिकेने टॉवर सील करण्याची कारवाई केली होती. जवळपास ३६ टॉवरविरोधात महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने २०१५ मध्ये धडक कारवाई केली होती. त्यावेळी अत्रे रंगमंदिरात लिलावाची कारवाई सुरू असताना एका कंपनीने न्यायालयात धाव घेत स्थगिती आदेश आणला होता.थकबाकीप्रकरणी मोबाइल टॉवर कंपन्यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे. विविध मोबाइल कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना योग्य प्रकारे आणि जलद उत्तम सेवा देण्यासाठी जवळपास ४८२ मोबाइल टॉवर उभारले आहेत. या मोबाइल टॉवरची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. त्यापैकी केवळ १२५ मोबाइल टॉवरसाठीच कंपन्यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी घेतलेली आहे. उर्वरित ३८७ टॉवर हे बेकायदा उभारण्यात आले आहेत. पालिकेच्या नगररचना विभागाकडून टॉवर उभारण्याची परवानगी दिलेली नसताना हे टॉवर विविध इमारतींच्या गच्चीवर उभारले गेले आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाकडून टॉवर उभारण्याची परवानगी नसताना टॉवर उभारले गेल्याने ते टॉवर पालिकेच्या लेखी बेकायदा आहेत. बेकायदा मालमत्तेस पालिका मालमत्ताकराच्या दुप्पट शास्ती आकारते. कंपन्यांनी मालमत्ताकरासह आकारलेली शास्तीची रक्कम बेकायदा असल्याचे म्हटले आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून याप्रकरणी परवानगी दाखवा, मग बोला, असा पवित्रा घेण्यात आला आहे. नगररचना विभागाकडून परवानगी नसलेल्या ३८७ बेकायदा मोबाइल टॉवरप्रकरणी कंपन्यांनी न्यायालयात मुद्दा उपस्थित केला आहे की, महापालिकेकडे आम्ही टॉवर उभारण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, महापालिकेकडून परवानगी मिळाली नाही. एखाद्या प्रकरणात परवानगी मागून ती विहित वेळेत दिली गेली नाही. त्याची मुदत उलटून गेल्यास परवानगी अर्जानुसार डिम परमिशन गृहीत धरून हे मोबाइल टॉवर उभारले गेले आहेत. त्यानुसार, हे टॉवर कायदेशीर असल्याचे म्हटले आहे.मालमत्ता करवसुली विभागाकडून हा मुद्दा ग्राह्य धरला जात नाही. त्यांच्या मते त्यांना परवानगीचा कागद हवा आहे. तरच परवानगी दिल्याचे सिद्ध होईल. महापालिकेच्या मालमत्ता विभागाने मोबाइल टॉवरच्या मालमत्ताकराची वसुली सुरू केली. मात्र, मोबाइल कंपन्या या नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांच्याशी महापालिकेने सक्तीने वागू नये. त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई करू नये, असे न्यायालयाने महापालिकेस आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता करवसुली विभागाची गोची झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मोबाइल कंपन्यांकडे असलेली थकबाकीची रक्कम व करवसुलीसाठी खाजगी कंपनीची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी निविदा प्रसिद्ध केली आहे. मोबाइल टॉवर मालमत्ताकरापोटी पालिकेने आतापर्यंत केवळ चार कोटी वसूल केले आहेत.निविदा भरण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत मुदतमोबाइल टॉवर कंपन्यांकडून करवसुलीसाठी पालिकेने निविदा २७ डिसेंबरलाप्रसिद्ध केली आहे.कंत्राटदार कंपन्यांनी या कामासाठी १७ जानेवारीपर्यंत निविदा भरून देणे अपेक्षित आहे.प्रतिसादाचा अंदाज घेऊ न त्यानंतर निविदा उघडण्यात येईल. त्यानंतर संबंधित कंपनीला वसुलीचे काम करण्याचे कार्यादेश काढण्यात येतील. याला प्रतिसाद न मिळाल्यास थकबाकी मार्च २०२० अखेर वसूल होणे शक्य होणार नाही.त्यामुळे ही प्रक्रिया एप्रिल २०२० नंतर होऊ शकते. चांगला प्रतिसाद मिळाला तर मार्च २०२० अखेर ही काही अंशी खाजगी कंपनीमार्फत वसुली होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.