शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

२७ गावांचा पाणीप्रश्न कायमच राहणार

By admin | Updated: March 1, 2016 02:34 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना सध्या एमआयडीसी पाणीपुरवठा करते. या गावांत सध्या पाण्याची समस्या तीव्र आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना सध्या एमआयडीसी पाणीपुरवठा करते. या गावांत सध्या पाण्याची समस्या तीव्र आहे. ज्या वेळी या गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अमलात येईल, तेव्हाच तेथील पाणीटंचाई संपुष्टात येईल, असे स्पष्टीकरण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने सोमवारी पार पडलेल्या महासभेत दिले. २७ गावांच्या पाणीबिलापोटी असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी भरली जात नसल्याने या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस एमआयडीसीने बजावली होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थ हवालदिल झाले होते. या प्रश्नावर नगरसेवक रमाकांत पाटील यांनी महासभेत सभा तहकुबीची सूचना मांडली होती. त्यावर चर्चा झाली. या वेळी पाण्याची समस्या केवळ २७ गावांत नसून शहरातही आहे. पाण्याचा प्रश्न शहरालाही तितकाच भेडसावतो आहे, असे म्हणणे अधिकाऱ्यांनी मांडले.भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पालिकेचे अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप केला. पालिकेने २७ गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जो आराखडा मंजूर केला आहे, त्याच्या कामाला अद्याप प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. बोअरवेल खोदल्या जात असल्या, तरी पाणी लागत नसल्याने त्या खोदून काय उपयोग होणार, असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले, पाण्यासाठी जो कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, तो २० कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आणखी १५ दिवस लागतील. त्यात वितरण व्यवस्था सुधारणे, जलकुंभ बांधणे, यांचा समावेश आहे. ही कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार आहेत. पाणीबिलाच्या थकबाकीवर निर्णय होणे बाकी...२७ गावांच्या थकबाकीसंदर्भात आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, एमआयडीसीने २७ गावांच्या पाणीबिलाची थकबाकी ७२ कोटी ६६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. ही थकबाकीची रक्कम एकाच हप्त्यात भरणे शक्य नाही. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यावर त्यांना मालमत्ताकर जरी लागू केला, तरी किमान सहा वर्षे तरी जुनीच करप्रणाली असावी, असा नियम आहे. गावे ग्रामपंचायतीत होती. त्यानुसार, एमआयडीसीने दर आकारावे. त्यांनी गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यावर महापालिकेचा दर आकारून थकबाकी दाखवली आहे. एमआयडीसीला महापालिकेने दर कमी करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात एमआयडीसीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक होऊन त्यावर तोडगा काढला जाणार आहे. जलस्वराज्य योजनेतील कामे अपूर्ण...२७ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलस्वराज्य योजनेंर्तगत कामे केली आहेत. त्यासाठी त्यांनी जलवाहिन्या टाकल्या होत्या. जलवाहिन्या टाकल्या, पण जलसाठवणुकीसाठी उभारलेले जलकुंभ कमी उंचीचे असल्याने त्यातून योग्य प्रकारे पाण्याचे वितरण होऊ शकत नाही. जलस्वराज्य योजनेचे काम अपूर्णच असल्याने केवळ निधी खर्च झाला आहे, असे कार्यकारी अभियंता जुनेजा यांनी निदर्शनास आणले. नगरसेविकेच्या मुलाची महिलांना शिवीगाळअंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील भेंडीपाडा येथील अपक्ष नगरसेविका हिराबाई जावीर यांच्या मुलाने प्रभागातील महिलांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रभागातील सांडपाणी हे आपल्या घरासमोर साठत असल्याने ते साफ करावे, अशी तक्र ार प्रतिमा जाधव आणि पाच महिला करण्यासाठी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास जावीर यांच्या घरी गेल्या होत्या. मात्र, सफाई करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे सांगून त्यांच्या मुलाने या महिलांना शिवीगाळ केली. या प्रकरणी प्रतिमा जाधव यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्र ार केली असता त्याच्याविरोधत अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे.