शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांचा निकाल जुलैत लागणार? महापालिका की स्वतंत्र नगरपालिका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:19 IST

स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत कोणतेही कर भरण्यास विरोध करत २७ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पालिकेच्या अन्य करांनाही विरोध केला आहे. त्याचवेळी ही गावे पालिकेत राहतात की नाही, हे ठरत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकाही त्या भागात एकही मोठा प्रकल्प राबवू शकत नाही.

कल्याण - स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत कोणतेही कर भरण्यास विरोध करत २७ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पालिकेच्या अन्य करांनाही विरोध केला आहे. त्याचवेळी ही गावे पालिकेत राहतात की नाही, हे ठरत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकाही त्या भागात एकही मोठा प्रकल्प राबवू शकत नाही. शिवसेनेला गावे महापालिकेच हवी आहेत, पण या गावांतील आपल्याच नेत्यांच्या गुंतवणुकीमुळे भाजपाची भूमिका संदिग्ध आहे. त्यातही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिकेत राहूनच या गावांचा विकास शक्य असल्याचे मत मांडले होते. त्यातून निर्माण झालेल्या कोंडीवर जुलैपर्यंत मार्ग निघण्याची चिन्हे आहेत.या गावांप्रश्नी सगळी प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सरकारला दिले आहे. त्यामुळे २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करायची की गावे महापालिकेतच ठेवायची याचा सोक्षमोक्ष तोवर लागण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.याबाबतचा प्रश्न जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केला होता. ही गावे जून २०१५ मध्ये महापालिकेत समाविष्ट केली. प्रभाग रचना व निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ७ सप्टेंबरला राज्य सरकारने अधिसूचना काढून पुन्हा गावे महापालिकेतून वेगळी करण्यासाठी हरकती सूचना मागवल्या. त्याला निवडणूक आयोगाने हरकत घेतली. निवडणुकीनंतरच ही प्रक्रिया राबवा, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी या गावांतील संघर्ष समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर अन्य दोन याचिकाही उच्च न्यायालयात आहेत. न्यायालयाने या प्रकरणी सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश दिला होता. पण सरकारने म्हणणे न मांडल्याने याचिकेवरील सुनावणी पुढे सरकलेली नाही. फेब्रुवारीत याचिकेवर सुनावणी अपेक्षित होती. ती झालेली नाही. २०१६ च्या विधीमंडळ अधिवेशनात शिंदे यांनी २७ गावांविषयी प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा कोकण विभागीय आयुक्तांकडून कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. पण त्याचा अहवाल न मिळाल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशात शिंदे यांनी हाच प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित केल्यावर त्यांना तसेच उत्तर देण्यात आले, हा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. पालिकेच्या हद्दीतील १३ बीओटी प्रकल्पांपैकी अनेक पूर्ण झालेले नाहीत. काही प्रकरणे न्यायालयात आहेत. या विषयी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याचा अहवाल आयुक्तांनी पाच वर्षांनी सरकार सादर केला. त्याचीच पुनरावृत्ती २७ गावांबाबत होऊ शकते, याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले. या मुद्द्यावरील चर्चेत सदस्य अनिल परब व जयंत पाटील यांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर रणजीत पाटील यांनीही चर्चेच्या मुद्याला दुजोरा दिला.अनधिकृत बांधकामांचे काय?सध्या या गावातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा गाजतो आहे. या गावांत ७९ हजार बेकायदा बांधकामे आहेत. शिवाय आणखी एक हजार बेकायदा बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे महापालिकेचा ७०० कोटीचा महसूल बुडत आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी राज्य सरकारकडे याविषयी तक्रार केली आहे. या गावातील आरक्षित जागेवरील बेकायदा इमारतीतील घरांचे रजिस्ट्रेशन बंद आहे.बेकायदा बांधकामांमुळे सरकारचा ३४ हजार ९८० कोटींचा महसूल बुडाला आहे. या गावात केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत १८० कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. पण स्वतंत्र नगरपालिका केल्याशिवाय कल्याण ग्रोथ सेंटर उभारु दिले जाणार नाही, तसेच मालमत्ता कर भरणार नाही असा पावित्रा सर्वपक्षीय संघर्ष समितीने यापूर्वीच जाहीर केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली