शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

27 गाव संघर्ष समितीचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:04 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेत येऊनही कोणत्या सोयी सुविधा मिळत नसल्याचे सांगत 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना घेराव घातला. तसेच ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर पाठवल्याबद्दल संघर्ष समितीने मालमत्ता कराची होळीदेखील केली.                                                                                                                                                                                                                     

ठळक मुद्देसंघर्ष समितीने मालमत्ता कराची केली होळी 27 गाव संघर्ष समितीचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती

डोंबिवली-  कल्याण डोंबिवली महापालिकेत येऊनही कोणत्या सोयी सुविधा मिळत नसल्याचे सांगत 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना शनिवारी घेराव घातला. तसेच ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर पाठवल्याबद्दल संघर्ष समितीने मालमत्ता कराची होळीदेखील केली.                                                                                                                                                                              वेगळी नगरपालिका हवी यासाठी 27 गाव संघर्ष समितीचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. महापालिकेत नुकतेच आलेले नविन आयुक्त गोविंद बोडके यांचा शनिवारी सकाळी 27 गावांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यानंतर वेळी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेत पालिका आयुक्तांचा ताफा रोखला. आणि नंतर काटई पोलीस चौकीमध्ये पालिका आयुक्तांना घेराव घातला. यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांवर आरोग्य यंत्रणा, शाळा, पायाभूत सुविधा, वाढवून आलेली मालमत्ता कराची बिलं आदीं प्रश्नांची सरबत्ती केली.     त्यावर संघर्ष समितीचे जे काही म्हणणे असेल ते आपण नक्कीच शासनाला कळवू असे उत्तर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांशी बोलणी झाल्यावर संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी बाहेर येत महापालिकेने पाठवलेल्या मालमत्ता कराच्या बिलाची होळी करून आपला रोष वाक्य केला. तसेच 27 गावांची वेगळी नगरपालिका करा, तोपर्यंत कोणीही मालमत्ता कर भरणार नाही या घोषणेचा पुनरुच्चारही केला. तसेच समितीची भूमिका समजून घेण्यासाठी आयुक्त बोडके यांनी समितीला सोमवारी दुपारी 3 वाजता कल्याण मुख्यालय येथे बैठकीला बोलावले आहे, अशी माहिती समितीचे गुलाब वझे यांनी दिली.                                                                                                                                            यावेळी झालेल्या आंदोलनामध्ये गुलाब वझे, अर्जुनबुवा चौधरी, वंडार पाटील, चंद्रकांत पाटील, दशरथ पाटील, विजय भाने, गजानन मंगरुळकर, भगवान पाटील, दत्ता वझे, वासुदेव गायकर, कृष्णाबुवा मढवी, सुधीर पाटील, गजानन पाटील, यांच्यासह 27 गाव संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली