शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२७ कोटींचा खर्च कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST

ठाणे : डायघर येथील कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविणे अशक्य असल्याचा साक्षात्कार महापालिकेला तब्बल १२ वर्षांनंतर झाला आहे. त्यामुळे ...

ठाणे : डायघर येथील कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविणे अशक्य असल्याचा साक्षात्कार महापालिकेला तब्बल १२ वर्षांनंतर झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची तयारी पालिकेने केली आहे. परंतु हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आलेला सुमारे २७ कोटींचा खर्चही आता पाण्यात जाण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प ठाणेकरांसाठी आदर्श ठरावा यासाठी सल्लागार नेमण्यात आला होता. एका कंपनीला या प्रकल्पाचा अभ्यास करण्याचे काम दिले होते. परंतु तो खर्चही आता कचऱ्यात जाण्याची शक्यता आहे.

ठाणे शहरात निर्माण होणाऱ्या ९६३ मेट्रिक टन कचऱ्यावर आजही शास्त्रोक्त प्रक्रिया होत नाही. तरीही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्यासाठी ठाणेकरांवर दडपशाहीचे धोरण पालिका राबवीत आहे. पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. त्यामुळे शहरातील कचरा दिवा येथील डम्पिंगवर टाकला जात आहे. शहराच्या विविध भागात छोटेमोठे प्रकल्प हाती घेतले असले तरी त्यातूनही पालिकेला काही खास असे करता आलेले नाही. डम्पिंगचा प्रश्न सुटत नसल्याने आणि कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावता येणे शक्य नसल्याने पालिकेचा स्वच्छ शहरांच्या यादीतील क्रमांक घसरला आहे.

दरम्यान, शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी १२ वर्षांपूर्वी डायघर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. परंतु या प्रकल्पाला विरोध झाल्याने पालिकेला तो यशस्वी करता आला नाही. त्यानंतर या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सर्व सोपस्कार करण्यात आले. या प्रकल्पालाही स्थानिकांचा विरोध होता. परंतु तो विरोध शांत करण्यात पालिकेला यश आले.

................

असा केला खर्च

हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेने ५ लाखांचा खर्च करून सल्लागाराची नियुक्ती केली. तसेच दुसऱ्या कंपनीला २० लाख देऊन याचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या ठिकाणी जाण्यासाठी पालिकेने ४ पदरी रस्ता बांधला आहे. हा रस्ता डम्पिंगसोबत येथील गावातही जात आहे. त्यामुळे त्याचा गावकऱ्यांना काही अंशी फायदा आहे. यासाठी २० कोटींचा खर्च करण्यात आला होता. याशिवाय येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी ७ कोटींचा खर्च करण्यात आला होता. त्यानुसार हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आतापर्यंत सुमारे २७ कोटींवर खर्च केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. याठिकाणी वृक्ष लागवडही केली असून, त्यासाठी काही लाखांचा खर्च झाल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.