शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

२६ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाण्याची नासाडी

By admin | Updated: September 26, 2015 00:27 IST

राज्यात परतीचा पाऊस समाधानकारकरित्या कोसळला असला तरी अजूनही शेतकऱ्यांवरील संकटासह शहरावरील पाणीकपातीचे संकट टळलेले नाही.

पालघर : राज्यात परतीचा पाऊस समाधानकारकरित्या कोसळला असला तरी अजूनही शेतकऱ्यांवरील संकटासह शहरावरील पाणीकपातीचे संकट टळलेले नाही. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत पाणी वाचवणे गरजेचे असताना पालघरमध्ये २६ गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू असून ती रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.पालघर तसेच २६ गावे प्रादेशिक ग्रामीण नळपाणीपुरवठा योजनेमध्ये १ लाख २५ हजार ५१० व्यक्तींना ७० लिटर्स प्रतिदिन पाणी शहरामध्ये तर ४० लिटर्स प्रतिदिन पाणी दरडोई वाटपाचे उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून पाणीपुरवठा केला जातो. ८ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठाही या योजनेतून केला जात आहे. सध्या पालघर नगापालिका क्षेत्रातील पालघर, वेवुर, घोलवीरा, टेंभोडे, नवली, लोकमान्यनगर, गोठणपुर, अल्याळी, अशा आठ गावासह सातपाटी, शिरगाव, कोळगाव, धनसार, दापोली, उमरोळी, वरखुंटी, कमारे, पडघे, वागुळसार, पंचाळी, हरणवाडी इ. २० गावांना सध्या सुर्यानदीवरील मासवण बंधाऱ्याजवळून पाणीपुरवठा केला जात आहे.दुरुस्ती कधी करणार...विदर्भ, मराठवाडा येथे पाऊस पडत नसल्याने राज्य दुष्काळाच्या छायेत सापडले आहे. अगदी मुंबई, ठाणे, शहरातही पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहीले होते. मध्यंतरी परतीच्या पावसाने थोडा दिलासा दिला असला तरी दररोज होणारी हजारो लिटर्स पाण्याची नासाडी रोखण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून केले जात नाही. जनावरांची आंघोळ, हातपाय धुणे, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात या पाण्याचा वापर सुरू असून या गळक्या व्हॉल्व्हच्या आसपास राहणारे काही लोक हे व्हॉल्व्हचे नट सैल करीत असल्याची शंका पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली जाते. हे गळके व्हाल्व्ह दुरूस्त करण्याची तसदी मात्र घेतली जात नसल्याने लाखो लिटर्स पाणी वाया जाण्याची प्रक्रिया अनेक महिन्यापासून सुरूच राहीली आहे.६४ लाख ५७ हजाराची थकबाकीठाण्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजना विभागाकडून प्रथम योजना तयार करण्यात आल्यानंतर पालघर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा योजना विभागाने ही योजना ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शविल्याने २०११ पासून ही योजना पालघर नगरपरिषद चालवते. या योजनेच्या देखभाल दुरूस्तीपोटी वार्षिक १७९.४१ लाख खर्च अपेक्षीत असताना सातपाटी व्यतिरीक्त इतर १९ गावांकडून वेळीच देखभाल दुरुस्ती खर्च येत नसल्याने ६४ लाख ५७ हजाराची थकबाकी थकल्याचे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हात्रे यांनी सांगितले.