ठाणे : मान्सूनच्या काळात कोणतीही जिवीत अथवा इतर प्रकारची हानी होऊ नये म्हणून ठाणे महापालिका सतर्क झाली आहे. त्यानुसार सर्व्हे करुन जमीन खचण्याची (भुस्खलनची) २६ ठिकाणे महापालिकेने जाहीर केली आहेत. यानुसार या २६ भागातील रहिवाशांना नोटीसा बजावून पावसाळ्यापूर्वी घरे खाली करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मागील वर्षीदेखील पालिकेने येथील रहिवाशांना नोटीसा बजावल्या होत्या. परंतु, कारवाई झालीच नाही. आता पुन्हा नोटीसा बजावल्या आहेत. मात्र, यंदा कारवाई होणार का नाही, याबाबत मात्र महापालिका प्रशासनच साशंक आहे. दोन वर्षापूर्वी ३० जुलै रोजी माळीण येथे झालेल्या दुर्घटनेत सुमारे २०० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर अशी घटना ठाण्यात घडू नये म्हणून पालिकेने अशा भागांचा मागील वर्षी सर्व्हे केला होता. दरम्यान यंदाही पालिकेने या भागातील हजारो रहिवाशांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. यामध्ये मुंब्रा, लोकमान्यनगर, इंदिरानगर, कळव्यातील आतकोनेश्वर नगर हे भाग तर हिटलिस्टवर आहेत. रायलादेवी प्रभाग समितीमधील १२, माजिवडा मानपाडा - ०२, कळवा - ०६, मुंब्रा ०५ आणि वर्तकनगर ०१ आदींचा या यादीत समावेश आहे. या सर्वच ठिकाणच्या रहिवाशांना आता सर्तकतेचे आदेश दिले आहेत.भुस्खलनाची संभाव्य ठिकाणे : संतोषनगर, पाटीलनगर, डक्ट लाईन, रेल्वे कॉलनी, एसटी उलाई शाळा, हणुमाननगर, शंकर मंदिर, इंदिरानगर टेकडी, रुपादेवी, भास्करनगर, पौंड पाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबा नगर, गावदेवी मंदिर (मुंब्रा), केनी नगर, कैलासनगर, आझादनगर, सैनिक नगर, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कशेळीपाडा, गुरदेव आश्रम, उपवन.
२६ भागांंना भुस्खलनाचा धोका!
By admin | Updated: May 26, 2016 03:14 IST