शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५ टक्के रुग्ण ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्याचा शहरी व ग्रामीण भाग ‘ब्रेक दी चेन’च्या तिसऱ्या स्तराचे उपाय अंगी बाळगून वावरत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्याचा शहरी व ग्रामीण भाग ‘ब्रेक दी चेन’च्या तिसऱ्या स्तराचे उपाय अंगी बाळगून वावरत आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही कमी झालेली आहे. याशिवाय सक्रिय रुग्णसंख्या २० हजारांहून सध्या चार हजार ५९९ वर आली. मात्र, गेल्या तीन महिन्यांचा तुलनात्मक विचार करता आजही या सक्रिय रुग्णांमधील ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर २५ टक्के गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यानुसार आजही एक हजार १५६ रुग्ण ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या उपचाराखाली तग धरून आहेत.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा कहर कमी करण्यासाठी सध्या ‘ब्रेक दी चेन’च्या उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. या उपाययोजनांच्या प्रारंभी ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकेने दुसऱ्या स्तराच्या उपाययोजना हाताळल्या. मात्र, वेळीच सावधान होऊन राज्य शासनाने महापालिकांसह सर्व जिल्हे तिसऱ्या स्तरात आणून ‘ब्रेक दी चेन’चे गांभीर्य निदर्शनास आणले. कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी २९ एप्रिलपासून हे निर्बंध पुढे १५ मेपर्यंत लागू ‌केले. त्यात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून ते १ जूनपर्यंत आणि आतापर्यंत आपण ‘ब्रेक दी चेन’च्या तिसऱ्या स्तराच्या निर्बंधात वावरत आहोत.

सक्रिय रुग्ण आणि उपचाराखाली असलेली रुग्णसंख्या विचारात घेऊन सध्याच्या तिसऱ्या स्तरातून सुटका होण्याची आशा पल्लवित झालेल्या आहेत; परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पदार्पण झाले तरीदेखील निर्बंधांतून मुक्ती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. याविरोधात संघटित व्यापारीवर्ग जिल्ह्यात आवाज उठवत आहे. १२ मेपासून आजपर्यंतच्या सक्रिय रुग्णसंख्येचा विचार करता गंभीर रुग्णसंख्या आजही २५ टक्के आहे. मेच्या यादिवशी २१ हजार ९५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यातील २५ टक्के म्हणजे चार हजार ८८७ रुग्ण ऑक्सिजन व १५६ व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते.

......