शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीपुरताच केला २५ दशलक्ष पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 23:50 IST

काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर आरोप; नागरिकांना भेडसावतेय टंचाई

मीरा रोड : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदरमध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी सत्ताधारी भाजपने २५ दशलक्ष लीटर पाणी नागरिकांना दिले. नंतर हे पाणी बंद केले, असा आरोप बुधवारी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात काही महिन्यांपासून नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे ,असे काँग्रेसने म्हटले आहे.नागरिकांना खाजगी अथवा पालिकेचा टँकर मागवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. टंचाईबाबत आमदार गीता जैन, प्रताप सरनाईक तसेच महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी थेट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पत्र पाठवून विचारणा केली. त्यावर महामंडळाने महापौरांना दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की , मीरा-भार्इंदरला मंजूर पाणीकोट्यातील २५ दशलक्ष लीटर पाणी हे २०१९ च्या पावसाळ्यापुरते तात्पुरत्या स्वरूपात दिले होते. हे पाणी मार्चपासून बंद केलेले आहे. १ मार्च ते ३१ आॅगस्टदरम्यान महामंडळाने महापालिकेत मंजूर कोट्यानुसार प्रतिदिवस सरासरी ९९.२१ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केलेला आहे, असे स्पष्ट केले आहे.महामंडळाने दिलेल्या उत्तरानंतर भाजप अडचणीत आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत, गीता परदेशी, अशरफ शेख आदींनी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी भाजप, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्यावर नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला.हे पाणी कायम असल्याचे भासवून शहरात मोठ्या संख्येने नवीन नळजोडण्या दिल्या गेल्या. नागरिकांनी नळजोडणीसाठी लाखो रुपये खर्च केले. पण, नळजोडण्या घेऊन नळाला पाणी नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून २५ दशलक्ष लीटर पाणी आम्ही नागरिकांना मिळवून देऊ, असे सामंत म्हणाले.एमआयडीसी, पालिका अधिकाऱ्यांची महापौरांनी घेतली बैठक२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा तात्पुरता पावसाळ््या पुरता म्हणून देऊन तो आता बंद केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड काँग्रेस सह विविध स्तरातून उठली आहे. त्यामुळे महापौरांनीही तातडीने या बाबत भाजप नगरसेवकांना घेऊन एमआयडीसी व पालिका अधिकाºयांची गुुरु वारी बैठक घेतली. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी बोलावलेल्या बैठकीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त , पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व एमआयडीसीचे अधिकारी तसेच भाजपच्या नागरसेवकांसह माजी आमदार नरेंद्र मेहताही उपस्थित होते . मीरा भार्इंदर साठी एमआयडीसीकडे मंजूर १२५ दशलक्ष लिटर इतके पूर्ण पाणी मिळावे, तांत्रिक बिघाडामुळे कमी दिलेले पाणी शहराला द्यावे, वारंवार होणाºया बिघाडांवर तोडगा काढावा. तर आयुक्त देखील स्वत: एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना भेटून पाणी समस्येवर चर्चा करतील असे महापौरांनी सांगितले .