शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटींची कामे रखडणार

By admin | Updated: May 11, 2016 02:02 IST

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका अंबरनाथमधील विकासकामांनाही बसणार आहे. महिनाभर ही आचारसंहिता राहणार असल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पुढे ढकलावी लागणार आहेत

पंकज पाटील,  अंबरनाथ विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका अंबरनाथमधील विकासकामांनाही बसणार आहे. महिनाभर ही आचारसंहिता राहणार असल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पुढे ढकलावी लागणार आहेत. त्यामुळे २५ कोटींची कामे रखडणार आहेत.अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक होऊन वर्ष झाले. या कालावधीत प्रभागांत एकही कामे झालेली नाहीत. आर्थिक तरतूद नसल्याने अनेक कामे मंजूर असतानाही प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. पहिल्या सर्वसाधारण सभेत २५० कोटींची कामे मंजूर झालेली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागांत २५ लाखांचे विषय घेत नव्याने कामे मंजूर केली. या सर्व कामांना मंजुरी मिळाल्यावर त्यांच्या निविदाही प्रशासनाने काढल्या. या निविदांना मागील आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीही मिळाली. मात्र त्या कामांचे आदेश देण्याआधीच आचारसंहिता लागू झाली. परिणामी ही सर्व कामे महिनाभर रखडणार आहेत. गेल्या वर्षभरात एकही काम न झाल्याने नगरसेवक आधीच अस्वस्थ आहेत. त्यातच आता आचारसंहितेमुळे पुन्हा त्यांच्या प्रभागातील कामांना विलंब होणार आहे. पालिका प्रशासनाने सरासरी १७ कोटींची कामे मंजूर केली आहेत. तर काही महत्त्वांच्या रस्त्यांची कामे विचारात घेता सरासरी २५ कोटींच्या विकासकामांना महिनाभर विलंब होणार आहे. पावसाळ्याआधी कामे करून घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या नगरसेवकांना ऐन पावसाळ्यातच ही सर्व कामे करावी लागणार आहे. अनेक प्रभागांतील नगरसेवकांनी पेव्हर ब्लॉक, चेकर्स टाईल्स, गटार दुरुस्ती, डांबरी रस्ते आणि सीसी पायवाटा ही कामे मंजूर करून घेतली आहेत. वर्षभरानंतर तरी ही कामे व्हावीत, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनामार्फत एकही कामे होणार नाही, हे निश्चित झाल्याने आता पालिकेतही शुकशुकाट पसरला आहे.