शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

२३० विहिरींना नव‘जीवन’

By admin | Updated: May 10, 2016 02:02 IST

सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. यात २३० विहिरींना नवजीवन मिळणार असून १५० बोअरवेल नव्याने खोदल्या जाणार आहेत

ठाणे : सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. यात २३० विहिरींना नवजीवन मिळणार असून १५० बोअरवेल नव्याने खोदल्या जाणार आहेत. यातील ७० टक्के विहिरींच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाले असून उरलेले १५ मे पर्यंत पूर्ण होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.ठाण्यातील पाणीकपातीमुळे सर्वत्र तीव्र टंचाई आहे. भविष्यात पुन्हा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने वापरात नसलेल्या विहिरी पुन्हा वापरात याव्या, यासाठी त्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. साफसफाईसोबतच गाळ काढण्याचे काम हाती घेतले. ठाण्यात ५५५ विहिरी आहेत. त्यातील २३० वापरात नाहीत. त्यांचीच स्वच्छता हाती घेतली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता माधव जांगडे यांनी दिली. यंदा पालिकेने १६० बोअरवेल नव्याने खोदल्या आहेत. त्यांचे काम आॅक्टोबरपासून सुरू झाले. यातील १३० बोअरवेलना पाणी लागले, तर ३० कोरड्या निघाल्या. सध्या ठाण्यात १,३७० बोअरवेल आहेत. त्यातील ७८६ बोअरवेलना हातपंप लावले आहेत. या बोअरवेलचा वापर झोपडपट्टी भागात पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी केला जातो. ३६० बोअरवेलचा वापर सार्वजनिक शौचालयांसाठी होतो. २२४ बोअरवेलना विद्युतपंप बसवण्यात आले असून त्यांचा वापर सार्वजनिक उद्याने, ठाणे महापालिकेच्या शाळा, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमी, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी केला जातो. पालिकेने १५० बोअरवेल खोदण्याचे काम सुरू केले असून त्यातील १० बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहे.