शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

२३ मराठी शाळा मान्यतेच्या प्रतिक्षेत

By admin | Updated: October 5, 2016 02:25 IST

मराठी शाळांना मान्यता देण्याबाबत शासकीय पातळीवर खूपच उदासीनता असून

बोईसर : मराठी शाळांना मान्यता देण्याबाबत शासकीय पातळीवर खूपच उदासीनता असून बृहत: आराखड्या अंतर्गत येणाऱ्या पालघर जिल्ह्यामधील तेवीस मराठी शाळा आजही मान्यतेच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी बोईसर येथे दिली.पंचतत्व सेवा संस्था (बोईसर) व मराठी अभ्यास केंद्र (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने व पालघर जिल्हा पत्रकार संघ यांच्या पुढाकाराने तारापूर एमआयडीसीमधील टीमा सभागृहात आयोजित केलेल्या मराठीकारणाचा एल्गार या कार्यक्रमात मराठी भाषेच्या चळवळी व गरजेबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील, पंचतत्व सेवा संस्थेचे जनरल सेक्रेटरी हिंदुराव सकपाळ, मराठी अभ्यास केंद्राचे पालघर जिल्ह्याचे समन्वयक सुशिल शेजुळे, मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य आनंद भंडारे आदी उपस्थित होते.डॉ. पवार यांनी मराठीच्या एकेका प्रश्नावर काम करून भागणार नाही. त्यासाठी अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढले पाहिजे, पालघर जिल्ह्यात मराठी भाषेची चळवळ ही जिल्ह्यातील माणसांनीच उभारली पाहिजे. असे सांगून महाराष्ट्रातील मराठी शाळांची संस्था झपाट्याने कमी होत असल्याचे सांगून नवश्रीमंतांचा वर्ग इंग्रजी भाषेच्या शाळा अर्थकारणाकरीता चालवितात असा दावा केला. शासनास परीभाषा व विश्वकोष ही वेळेवर काढता येत नसल्याची टीका करून अनुदानाकरीता आमच्या दारात कुणी येऊ नये ही भूमिका शासनाची असल्याचे सांगितले.