शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

२२७ हरवलेली बालके स्वगृही परतली

By admin | Updated: August 2, 2015 01:55 IST

हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी राज्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत ठाणे शहर पोलिसांमुळे ३१ दिवसांत २२३ बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट क रून दिली.

ठाणे : हरवलेल्या बालकांच्या शोधमोहिमेसाठी राज्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’अंतर्गत ठाणे शहर पोलिसांमुळे ३१ दिवसांत २२३ बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट क रून दिली. यामध्ये हरवलेल्या दोन विशेष बालकांसह कोणतीही तक्रार दाखल नसलेल्या ४१ बालकांचा त्याचबरोबर बालसुधारगृहांत जीवन जगणाऱ्या ५८ बालकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हरवलेल्या ६९ मुली घरी पाठविल्याची माहिती चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने दिली. भारत सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यात १ ते ३१ जुलैदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत चार पथके तयार केली होती. या पथकांद्वारे ठाणे शहरासह जिल्ह्यातील हरवलेल्या मुलांची तपासणी केली. विशेष म्हणजे बालसुधारगृहांतील बालकांना स्वगृही पाठविण्यावर विशेष भर दिला होता. या विशेष मोहिमेंतर्गत २२७ बालके पोलिसांना सापडली. त्यातील २२३ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे, तर बेवारस सापडलेल्या ४ मुलांना सुधारगृहात दाखल केले. (प्रतिनिधी)पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली मुले/मुलीमाहिती मिळालेले : ८ (मुले ४, मुली ४), अपहरण : ३५ (मुले १३, मुली २२), बेवारस : ४१ (मुले ३४, मुली ७), बालकामगार : ३५ (मुले ३३, मुली २), भिक्षेकरी : ४४ (मुले २१, मुली २३) सुधारगृहातून पालकांच्या ताब्यात : एकूण ५८ (मुले ४७, मुली ११)बेवारस मुले सुधारगृहात दाखल : एकूण ४ (मुले ४)विशेष बालक : एकूण २ (मुले २)मुलीसाठी पालक झाले भिकारी...१काकासोबत मुंबई पाहण्यासाठी मध्य प्रदेशमधून जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेली लक्ष्मी धानक ही १२वर्षीय मुलगी त्यांच्या झालेल्या चुकामुकीमुळे हरवली होती. याबाबत, तिच्या काकांनी पोलीस ठाण्यात तक्रार न करता तिच्या शेतकरी आईवडिलांना सांगितले. २मुलीचा शोध घेता-घेता आणलेले पैसे संपले, पण मुलीला घरी घेऊन जाणारच, असा निश्चय केल्याने मुंबईत भीक मागून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. याचदरम्यान, ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट डोंगरी बालसुधारगृहात जात असताना भायखळा रेल्वे स्थानकात हे धानक दाम्पत्य रडत भीक मागताना दिसून आले. ३त्यांची चौकशी केली असता मुलगी हरवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांनाही त्या बालसुधारगृहात नेले. तेथे लक्ष्मी मिळून आली. विशेष म्हणजे हे दाम्पत्य येताना मुलीचे सर्व पेपर आणि फोटो घेऊन आल्याने त्यांची पुनर्भेट झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली मुले/मुलीमाहिती मिळालेले : ८ (मुले ४, मुली ४), अपहरण : ३५ (मुले १३, मुली २२), बेवारस : ४१ (मुले ३४, मुली ७), बालकामगार : ३५ (मुले ३३, मुली २), भिक्षेकरी : ४४ (मुले २१, मुली २३) सुधारगृहातून पालकांच्या ताब्यात : एकूण ५८ (मुले ४७, मुली ११)बेवारस मुले सुधारगृहात दाखल : एकूण ४ (मुले ४)विशेष बालक : एकूण २ (मुले २)