शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

जीवावर उदार होऊन ठाण्यात २२० कोरोना योद्धे करताहेत औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 16:56 IST

अत्यावश्यक सेवेत असलेल्या २२० कर्मचारी फवारणीचे काम सध्या ठाण्यात करीत ाहेत. आपला जीव जोखमीत टाकून त्यांच्याकडून हे कार्य सुरु आहे. यामध्ये हंगामी स्वरुपाच्या कामगारांचाही समावेश आहे.

ठाणे : तात्काळ कामावर हजार व्हा, अमुक अमुक ठिकाणी फवारणी कारायची आहे. असा ठेकदाराचा फोन येताच हंगामी कामगार म्हणून भरती झालेला कामगार सोबत संरक्षण किट आणि औषध फवारणीचा टँक घेऊन कर्तव्यावर हजर होतात. मग ठेकेदार सांगेल त्या कोरोना बाधित रु ग्णाच्या परिसरात, गल्लीबोळात, घरात फवारणी करतात. ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात असे ७० हंगामी आणि १५० कायमस्वरूपी कामगार ठाणे शहर कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.                  कळवा, मुंब्रा डेंजर झोनमध्ये आल्यानंतर ठाणे महानगर पालिका आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून जंतुनाशक औषधांची फवारणी करणार्या फायलेरिया विभागामार्फत कोरोना बाधित परिसरात मोठ्या प्रमाणात फवारणी केली जात आहे. रस्त्यांवर अग्निशमन दलाच्या मदतीने यंत्राच्या सहाय्याने फवारणी केली जात आहे. तर झोपडपट्टी, सोसायट्या आणि कोरोना बाधित रु ग्णाच्या घराशेजारी कामगारांच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे. पालिकेकडे सुमारे १५० कामगार कायमस्वरूपी शहरात फवारणीचे काम करत असतात. तर पावसाळ्यात रोगराई वाढत असल्याने चार महिन्यांसाठी हंगामी तत्वावर तात्पुरत्या कामगारांची ठेकेदारी पद्धतीवर भरती केली जाते. शहरात अशा प्रकारचे सुमारे ७० कामगार हे काम करत आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाचे पॉझटिव्ह रु ग्ण आढळून येतात, त्या ठिकाणचा परिसर निर्जंतुक करण्यासाठी या कामगारांना पाठविले जाते. ठेकेदाराकडून त्यांना अंगावर परिधान करणारा सूट, हातमोजे, मास्क, सॅनिटाइझर पुरविले जाते. मात्र ठेकेदाराकडून अवघा १२ हजार रु पये पगार दिला जातो. पगाराच्या कोर्या रजिस्टरवर कामगारांच्या सह्या घेतल्या जातात. कामगार विमा रु ग्णालयाचे पैसे कापले जात असतानाही गेल्या चार वर्षांपासून अद्याप त्यांना कामगार रु ग्णालयाच्या सुविधा मिळालेल्या नाहीत. गेल्या दिवाळीचा बोनस आणि गेल्या महिन्याचा पगार देखील अद्याप दिला गेला नसल्याचा आरोप हे हंगामी कामगार करत आहेत. ठेकेदार सांगेल त्या वेळेला, अगदी जेवता जेवताही फवारणीसाठी यावे लागते. असेही कामगारांचे म्हणणे आहे. हंगामी कांमगारांना अशा कितीही अडचणी असल्या तरीदेखील ते ठाणेकरांचे आरोग्य बोघडू नये म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून औषधांची फावरणी करत आहेत.

  • मुंबईतच्या धर्तीवर ठाण्यातील या कामगारांना देखील ३०० रु पयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जावा. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जावी. एखादा कोरोना बाधित झाला तर तीन मिहने त्याला भरपगारी रजा दयावी. कोरोना संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला पालिकेत नोकरी आणि एक कोटी रु पये द्यावेत.

- चेतन आंबोणकर, चिटणीस, मूनिसपल लेबर युनियन 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या