शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमधून २२ जण इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:37 IST

कल्याण-डोंबिवली : आमदारांबरोबर नगरसेवक, पदाधिकारीही स्पर्धेत

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील चार मतदारसंघांतून भाजपमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या गुरुवारी पक्षाचे निरीक्षक तथा प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी २२ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात तीन विद्यमान आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. कल्याण पश्चिममधून सर्वाधिक १० जण इच्छुक आहेत. विशेष म्हणजे, कल्याण पश्चिममधील शिवसेना नगरसेविक ा मनीषा तारे यांचे पती व पक्षाचे पदाधिकारी साईनाथ तारे यांनीही भाजपमधून इच्छुक म्हणून मुलाखत दिली आहे.

भाजपच्या डोंबिवली पूर्व मंडल कार्यालयात सकाळी १० ते ११ दरम्यान कल्याण जिल्हा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी देशपांडे, जिल्हाध्यक्ष व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या चारही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात कल्याण ग्रामीण मतदारसंघात इच्छुक असलेल्यांमध्ये शिवाजी आव्हाड, नंदकिशोर परब, डॉ. सुनीता पाटील, रोहिदास मुंडे, मोरेश्वर भोईर, निलेश पाटील, अ‍ॅड. आदेश भगत यांचा समावेश आहे.

डोंबिवलीसाठी राज्यमंत्री चव्हाण आणि महेंद्र रजपूत यांनी मुलाखती दिल्या. कल्याण पश्चिममधून आ.नरेंद्र पवार, संदीप गायकर, वरुण पाटील, साधना रवी गायकर, वैशाली पाटील, महेश जोशी, अर्जुन म्हात्रे, साईनाथ तारे, अर्जुन भोईर, डॉ. चंद्रशेखर तांबडे इच्छुक आहेत. तर, कल्याण पूर्वेसाठी मुलाखत देणाऱ्यांमध्ये आ. गणपत गायकवाड, विष्णू गायकवाड, हर्षल साळवी यांचा समावेश आहे.दरम्यान, विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाते की बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, याबाबतचा अहवाल पक्षनेतृत्वाकडे सोपवल्यावर तेच निर्णय घेतील, अशी माहिती देशपांडे यांनी दिली. गणपतीनंतर शिवसेनेसोबत जागावाटपाची चर्चा होणार आहे. शिवसेना-भाजपची युती कायम असून ही स्वबळाची तयारी नाही. मित्रपक्षालाही याचा फायदा होऊ शकतो, असेही ते म्हणाले.‘त्यांचा’ शिवसेनेशी संपर्क नाहीशिवसेना नगरसेविका मनीषा तारे यांचे पती व पक्षाचे ठाणे ग्रामीण सचिव साईनाथ तारे यांनीही गुरुवारी भाजपच्या वतीने इच्छुक म्हणून मुलाखत दिल्याने शिवसेनेला हा एक धक्का असल्याचे बोलले जाते. यासंदर्भात तारे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकसभा निवडणुकीपासून तारे शिवसेनेच्या संपर्कात नाहीत, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.‘गायकवाड भाजपचेच आमदार’कल्याण पूर्व मतदारसंघातून गणपत गायकवाड यांनी मुलाखत दिली आहे. अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले गायकवाड हे आतापर्यंत भाजपचे सहयोगी आमदार म्हणून ओळखले जात होते. परंतु, मुलाखतीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री चव्हाण यांनी गायकवाड यांनी दोन वर्षांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना सहयोगी म्हणणे उचित नाही. ते आमचेच आमदार आहेत, असे स्पष्टीकरण दिले.