शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महासभेच्या जेवणावळीवर २२ लाखांची उधळपट्टी

By admin | Updated: September 1, 2015 04:32 IST

विषयाला अनुसरून चर्चा करण्याऐवजी ती भलत्याच विषयांवर करून महासभा एकदा चालविण्याऐवजी ती पाच ते सात वेळा घेण्यास भाग पाडून केवळ जेवणावळी वरती लाखोंची

ठाणे : विषयाला अनुसरून चर्चा करण्याऐवजी ती भलत्याच विषयांवर करून महासभा एकदा चालविण्याऐवजी ती पाच ते सात वेळा घेण्यास भाग पाडून केवळ जेवणावळी वरती लाखोंची उधळपट्टी करण्याचा अनोखा विक्रम ठाणे महापालिकेतील राजकीय भोजनभाऊनी केला आहे. मागील पाच महिन्यांत किमान पाच महासभा होणे अपेक्षित असताना त्या तब्बल ३६ झाल्या असून त्यासाठीच्या जेवणावळीवर सुमारे २२ लाखांहून अधिकची उधळपट्टी झाली आहे. या खर्चाबाबत शहरवासीयांत संताप व्यक्त होत आहे. २०१२ नंतर ठाणे महापालिकेची आर्थिक तसेच राजकीय घडी पुरती विस्कटलेली आहे. त्यात प्रत्येक महिन्यात होणाऱ्या महासभेच्या निमित्ताने कधी प्रशासनावर तर सत्ताधाऱ्यांविरोधात किंबहुना कधी संगनमताने एकच महासभा महिनाभर चालविण्याचा प्रताप ठाण्यातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. काही वेळेस सचिवांची कॉलर पकडणे, त्यांच्यावर पाणी टाकणे, उद्धटपणे बोलणे आणि विषयाला सोडून इतर मुद्यांवर चर्चा करून सत्ताधारी आणि विरोधक अनेक वेळा महासभेचा वेळ वाया घालवतांना दिसले आहेत. याची नाराजी महिला सदस्यांनी अनेक वेळा सभागृहात बोलून दाखविली. परंतु, एकच महासभा अनेक वेळा चालविण्याचा कित्ताच या राजकीय पुढाऱ्यांनी गिरवणे सुरूच ठेवले आहे. प्रत्येक महिन्याला एक महासभा घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार, एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत पाच महासभा होणे अपेक्षित होते. परंतु, या कालावधीत तब्बल ३६ महासभा झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. प्रत्येक महासभेला साधारणपणे सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळी चहा असे ठरलेले आहे.