शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयात महिनाभरात दगावली २१ नवजात बालके

By अजित मांडके | Updated: July 5, 2024 17:51 IST

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील वर्षी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता मागील महिनाभरात याच रुग्णालयात नवजात २१ बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे.  या नवजात बालकांचे वजन कमी असल्यानेच त्यांचा मृत्यु झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात एकाच दिवशी तब्बल १८ रुग्णांचा मृत्यु झाल्याने हे रुग्णालय अधिकच चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एका महिन्यात तब्बल २१ नवजात बालके मृत्यु झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु या घटनेनंतर कळवा रुग्णालयाच ताण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले होते. परंतु त्यानंतरही आजही रुग्णालय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयाचा ताण आजही कमी झाला नसल्याचेच दिसून आले आहे. रुग्णालयात ५०० खाटा आहेत. तर रोजच्या रोज या रुग्णालयात ४५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. तर लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागात सध्या एनआयसीयूमध्ये 30 खाटा आहेत, त्यातील 20 खाटा रुग्णालयातील प्रसूतीसाठी नोंदणी झालेल्या महिलांसाठी राखीव आहेत तर इतर दहा ठाणे, पालघर आणि इतर आदिवासी भागातील रुग्णांचा भार हाताळण्यासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, रुग्णालयात गेल्या जून महिन्यात ठाणे व पालघर जिल्ह्यातील ५१२ महिला प्रसूती साठी दाखल झाल्या होत्या.त्यातील ९० प्रसूती महिलांची नोंदणी ही रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलांची आहे. तर उर्वरीत इतर जिल्ह्यातील होत्या त्यातील २९४ या सिझरिन प्रसूती होत्या. त्यातील प्रसूती झालेल्या महिला रूग्ण पैकी ८ नवजात बालकांचा ४८ तासांत मृत्यू झाला होता. तर पूर्ण जून महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे. 

जून महिन्यात मृत्यू झालेल्या २१ मुलांचे वजन दीड किलो पेक्षा कमी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकूडन देण्यात आली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती असलेल्या प्रसूतीसाठी महिला दाखल झाल्या होत्या ९० नवजात शिशुचे वजन १ किलो वजनापेक्षा कमी होते. २१ पैकी १९ हे बाहेरचे बालक हे बाहेरचे होते त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

या प्रकरणाचा अहवाल रुग्णालय प्रशासनाचे डीन डॉ. राकेश बारोट यांच्याकडून मागविण्यात आला आहे. मृत्यु पावलेल्या नवजात बालकांचे वजन हे दिड किलो पेक्षा कमी असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. परंतु आता याची चौकशी केली जाईल,आणि याचा अहवाल हा सभागृहसमोर सादर केला जाईल.- उमेश बिरारी - उपायुक्त, ठामपा

टॅग्स :hospitalहॉस्पिटल