शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२००० पूर्वीच्या झोपड्यांचे भुईभाडे रद्द

By admin | Updated: May 26, 2017 00:02 IST

राज्याच्या महसूल विभागाने मीरा-भार्इंदरमधील राज्य सरकारच्या जागेवर वसलेल्या शेकडो झोपड्यांना भुईभाडे तसेच

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : राज्याच्या महसूल विभागाने मीरा-भार्इंदरमधील राज्य सरकारच्या जागेवर वसलेल्या शेकडो झोपड्यांना भुईभाडे तसेच अकृषिक (एनए) शुल्कापोटी रक्कम भरण्याच्या नोटीसा काही महिन्यांपूर्वी पाठवल्या होत्या. ती रक्कम न भरल्यास झोपडीच हटवण्याचा इशारा दिल्याने त्यावर मंगळवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात बैठक झाली. यात २००० पूर्वीच्या झोपड्यांचे भुईभाडे व एनए शुल्क रद्द करण्यासह २००० नंतरच्या झोपड्यांना मात्र १ रुपया प्रतिदीन प्रमाणे शुल्क आकारण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शहरात सुमारे ४६ झोपडपट्या आहेत. बहुतांश झोपडपट्या राज्य सरकारच्या जागेवर वसल्या आहेत. या झोपड्यांना महसूल विभागाने फेब्रुवारीमध्ये १८ हजारापेक्षा अधिक रकमांचे शुल्क जमा करण्याच्या अंतिम नोटीसा धाडल्या होत्या. सरकारी जागांचा वापर करण्यात येत असल्यापोटी भुईभाडे तसेच त्यावर झालेल्या बांधकामापोटी एनए शुल्क अदा करण्यासाठी त्या नोटीसा पाठवल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. पहिल्यांदाच अशा प्रकारची नोटीस मिळाल्याने झोपडीधारकांवर राजकीय उंबरठे झिजवण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली. झोपडीधारकांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यास सुरूवात केली. महसूलमंत्र्यांनी १३ मे रोजी शहराला भेट देत झोपडीधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारी शुल्क भरावेच लागणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावर महसूलमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शुल्क रद्द व नाममात्र दराने भुईभाडे आकारण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. आमदार मेहता, महापौर गीता जैन, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, आयुक्त डॉ. नरेश गीते आदींसह झोपडीधारकांचे प्रतिनिधी, बारचालक, विकासक व अधिकारी उपस्थित होते.