शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

६०० किलो ओल्या कचऱ्यापासून सहा वर्षांत बनवले २०० किलो जैवखत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: February 8, 2024 11:22 IST

घराबाहेर गेला नाही कचऱ्याचा एकही कण, तरुणाचे व्यवस्थापन

प्रज्ञा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या ६ वर्षांत ठाण्यातील वालावलकर कुटुंबाने घरच्या घरी कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यांच्या घरातून कणभरही कचरा बाहेर टाकलेला नाही. ते ओल्या (जैवविघटनशील) कचऱ्याचे घरातच जैवखतात रूपांतर करत असून, सहा वर्षांत जवळपास ६०० किलो ओल्या कचऱ्यापासून जवळपास २०० किलो जैवखत तयार केले. सगळा सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठवतात. पर्यावरणशास्त्रात पदव्युत्तर पदवीधारक प्रतीक वालावलकर या तरुणाने याकरिता पुढाकार घेतला. 

वालावलकर यांच्या घरगुती सेंद्रिय कचरा व्यवस्थापन प्रकल्पात सहा वर्षात अर्ध्या टनापेक्षा अधिक सेंद्रिय कचरा त्यांच्या घराबाहेर जाण्यापासून रोखला आहे. घरात दररोज तयार होणारा सेंद्रिय कचरा बारीक चिरून तो बादलीत नीट पसरवून ढवळला जातो. त्याला अवघी दहा ते पंधरा मिनिटे लागतात, असे प्रतीकने सांगितले. या विघटन प्रक्रियेतून घरातील झाडांच्या वाढीकरिता आणि मातीची सुपीकता, तिचा पोत वाढवण्याकरिता आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांनीयुक्त सेंद्रिय खताची निर्मिती होते. सेंद्रिय कचऱ्याच्या विघटन प्रक्रियेतून निघणाऱ्या पाण्यात सेंद्रिय खतातील पोषक घटक मिसळलेले असल्यामुळे सेंद्रिय खताप्रमाणेच ते पाणी सुद्धा आपण घरातील झाडांच्या मातीत टाकू शकतो.   ऑगस्ट २०१३ मध्ये प्रतीकने त्याच्या गृहसंकुलात निर्माल्य आणि भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून जैवखत निर्मितीचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला. त्यानंतर गृहसंकुलातील झाडांच्या पालापाचोळ्यापासून गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला, ज्यातून जवळपास ८०० किलोग्रॅम दर्जेदार अशा गांडूळखताची निर्मिती झाली होती.

जैवखत उत्कृष्ट प्रतीचे उत्कृष्ट प्रतीचे जैवखत नजरेने, गंधाने आणि स्पर्शाने ओळखण्याच्या काही खुणा आहेत; त्याचा रंग काळा असतो, त्याला मातीचा वास असतो, वजनाने ते मातीपेक्षा हलके असते, त्यात मुबलक प्रमाणात ओलावा असतो. या सगळ्या खुणा आमच्या जैवखताशी अगदी तंतोतंत जुळतात. स्वयंपाकघरात रोज उत्पन्न होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचे आणि देवघरातील निर्माल्याचे घरगुती पातळीवरच दुर्गंधी विरहीत शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होत राहते. 

टॅग्स :thaneठाणेFertilizerखते