शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कामातील दिरंगाई करणा-या ठेकेदारास २० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:11 IST

कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयासाठी मंजूर झालेला सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न करता दिरंगाई केली. यामुळे ठाणे महापालिकेने शारदा इन्व्हेन्शन या ठेकेदार कंपनीला

- सुरेश लोखंडे 

ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयासाठी मंजूर झालेला सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न करता दिरंगाई केली. यामुळे ठाणे महापालिकेने शारदा इन्व्हेन्शन या ठेकेदार कंपनीला नुकताच २० लाखांचा दंड ठोठावला आहे. यामुळे कामचुकार ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.सततच्या वाढत्या वीजबिलाच्या रकमेतून मुक्त होण्यासाठी ठाणे मनपाने शिवाजी रुग्णालयासाठी सोलर ऊर्जा प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाचा सुमारे तीन कोटी ९९ लाख ६० हजार रुपये खर्चाचा ठेका शारदा इन्व्हेन्शन कंपनीला दिला आहे. १३ फेब्रुवारी २००९ ला देण्यात आलेले हे काम सुमारे सहा महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. तसा करारही झालेला आहे. परंतु, हा सोलर प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहे. तो वेळेत पूर्ण न केल्यामुळे संबंधित कंपनीला प्रतिदिन १० हजार रुपये दंड भरण्याची कारवाई झाली आहे.सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे गांभीर्य लक्षात न घेता ठेकेदार कंपनीने निष्काळजी केली. या प्रकल्पासाठी आणलेले महागडे साहित्य, यांत्रिक साहित्य, मशिनरी गंज खात असून सडत आहे. ठाणे महापालिकेनेदेखील त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते संजीव दत्त यांनी माहितीचा अधिकार टाकून ठाणे मनपाचे लक्ष वेधले. याशिवाय, करारानुसार कंपनीवर दंड आकारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. तब्बल २० लाख रुपये दंड ठोठावण्याची कारवाई महापालिकेला करावी लागली आहे. कराराप्रमाणे मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारण्यात आला.सुमारे १९६० दिवस विलंब झाल्याची बाब दत्त यांनी निदर्शनात आणून दिल्यानंतर संबंधित कंपनीवर सुमारे २० लाखाचा दंड भरण्याची कारवाई केली आहे.ठाणेकरांच्या पैशांतून उभा करण्यात येत असलेला हा ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यामुळे कंपनीवर त्वरित कारवाई करावी. रेंगाळलेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दत्त यांनी २०१२ पासून महापालिकेकडे तगादा लावला.त्यास दाद न देता कंपनीची पाठराखण करणाºया महापालिकेला अखेर कर्तव्याची जाणीव करून देऊन कंपनीकडून २० लाखांचा दंड वसूल करण्यास भाग पाडण्यात आले.संबंधित कंपनीच्या इसारा रक्कम, सुरक्षा अनामत आणि बँक गॅरंटी आदींच्या २४ लाख ४८ हजार ९०० रुपयांतून दंड २० लाख रुपये वसूल केल्याचे ठाणे मनपाचे कार्यकारी अभियंता विनोद गुप्ता यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे वेळेत काम न करणाºयांचे धाबे दणाणले आहे.