शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विविध विकासकामांची २० कोटींची बिले थकीत; अंबरनाथ पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 00:12 IST

कोविडवर खर्च केल्याने निधीच शिल्लक नाही, प्रशासन झाले हतबल

अंबरनाथ :   अंबरनाथ नगरपालिकेने शहर विकासाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या कामांची बिले देण्यासाठी पालिकेकडे निधी शिल्लक नाही. विकासकामांची २० कोटींची बिले थकली आहेत. सर्व निधी कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च झाल्याने शहर विकासाच्या कामांची बिले देण्यासाठी निधी नसल्याने कंत्राटदारांनी कामे संथगतीने सुरू ठेवली आहेत. भविष्यातील कामांसाठीही निधी शिल्लक नसल्याने नवीन कामांना सुरुवात झालेली नाही. कोरोनामुळे पालिकेची आर्थिककोंडी झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

अंबरनाथ नगरपालिका सध्या आर्थिक कोंडीचा सामना करत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनावरील खर्च अफाट झाल्याने आता त्याचा थेट परिणाम हा पालिकेच्या कामकाजावर होत आहे. आपत्कालीन परिस्थिती असल्याने पालिकेने कोणताही विचार न करता कोरोना नियंत्रणाला प्राधान्य दिले होते. त्यामुळे शहरातील इतर कामांच्या बाबतीत आता आर्थिककोंडी झाली आहे. सरकारकडून हवी तशी आर्थिक मदत कोरोनासाठी न झाल्याने पालिकेने सर्व विकासकामांचा निधी हा कोरोनावर खर्च केला. 

आता हा खर्च एवढा वाढला आहे की, पालिकेला आता त्यांच्याकडे आलेले बिल कसे द्यायचे, हा प्रश्न पडला आहे. बिलांसोबतच पालिकेच्या कर्मचा-यांसाठी येणारे सरकारी अनुदानही कमी झाल्याने त्या कर्मचा-यांच्या पगारामधील तफावत असलेली रक्कम कुठून आणावी, हा प्रश्न पडला आहे. तर, दुसरीकडे शहरातील काँक्रिट रस्त्यांसह इतर विकासकामांच्या बाबतीतही तीच अवस्था आहे. या विकासकामांचे बिल देण्यासाठी पालिकेकडे निधी शिल्लक नसल्याने कंत्राटदारांची कोंडी झाली आहे. बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांनी इतर विकासकामे संथगतीने सुरू ठेवली आहेत.

टॅग्स :ambernathअंबरनाथ