शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यावर २० सीसीटीव्हींचा वॉच, आठ ते दहा बकºया, दोन गायी केल्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:21 IST

मुरबाड, टोकावडे आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून दहशत पसरवणाºया बिबट्याला हेरण्यासाठी ठाणे वन विभागामार्फत या भागात तब्बल

ठाणे : मुरबाड, टोकावडे आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून दहशत पसरवणाºया बिबट्याला हेरण्यासाठी ठाणे वन विभागामार्फत या भागात तब्बल २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यामार्फत त्याच्या हालचाली टिपण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार, दोन कॅमेºयांत सध्या त्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत. यातूनच स्थानिक पोलीस, वन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या टीम तयार करून त्यामार्फतदेखील त्याचा मागोवा घेतला जात आहे. याशिवाय, येथील रहिवाशांमध्ये जनजागृतीचे कामही केले जात असल्याची माहिती ठाणे वन विभागाने दिली.२६ आॅक्टोबरपासून बिबट्याने मुरबाड तालुक्यात आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. मागील १५ दिवसांत त्याने तीन हल्ले करून आठ ते दहा बकºया आणि दोन गायी फस्त केल्या आहे. त्यामुळे येथील पाळीव प्राणी धोक्यात आले आहेत. सुदैवाने मागील वर्षी ज्या पद्धतीने बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता, तशी सध्या परिस्थिती ओढवलेली नाही. परंतु, तशी परिस्थिती येऊच नये, यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेतल्याची माहिती ठाणे वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. सध्या येथे कापणीचा मोसम सुरू असल्याने शेतकरी एकटादुकटा घराबाहेर निघत आहे. परंतु, त्याने एकट्याने न जाता सोबत दोघातिघांना घेऊन जावे, रात्रीचे खेकडे पकडणे बंद करावे. मुक्या प्राण्यांना बाहेर बांधू नये. लहान मुलांना सायंकाळनंतर बाहेर सोडू नये, यासह इतर जनजागृतीच्या उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी या भागात विविध ठिकाणी २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यानुसार, दोन कॅमेºयांत सध्या त्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत. यातूनच त्यांनी आता त्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या कॅमेºयांमधील बिबट्याचे चित्रीकरण तपासून त्याआधारे तो नरभक्षक झाला आहे का, याचाही अभ्यास सुरू आहे. या अभ्यासानंतर त्या त्याच्यासंदर्भातील पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, वन विभागाचे अधिकारी, तहसीलदार, पोलीस, स्वयंसेवी संस्था यांची एक कमिटीदेखील या कामी स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. तर, वन विभागाचे पथक आणि सामाजिक संस्थामार्फत त्याला शोधण्याचे काम सुरू आहे.