शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

भामट्यांकडून ५३ एमटीएम कार्ड्स जप्त, राज्यभरात अनेक ठिकाणी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 01:18 IST

ठाण्यातील दहिसर येथील रहिवासी शंभुनाथ योगी हे १७ आॅक्टोबर २०१८ रोजी एटीएममधून रोकड काढण्यासाठी गेले होते.

ठाणे : एटीएम केंद्रांमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने राज्यभरातील बँक खातेदारांची वेगवेगळ्या ठिकाणांहून फसवणूक करणाऱ्या श्रीकांत गोडबोले (२५, रा. मलंग रोड, कल्याण, ठाणे) आणि प्रवीण साबळे (२२, रा. माळेगाव, एमआयडीसी, सिन्नर, जि. नाशिक) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे ५३ एटीएमकार्ड जप्त केली आहेत.

ठाण्यातील दहिसर येथील रहिवासी शंभुनाथ योगी हे १७ आॅक्टोबर २०१८ रोजी एटीएममधून रोकड काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका भामट्याने त्यांना पैसे काढून देण्याचा बहाणा करून त्यांच्या एटीएमकार्डच्या आधारे २९ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात १८ आॅक्टोबर २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे पोलीस नाईक संजय बाबर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे आणि संदीप बागुल यांच्या पथकाने ११ जानेवारी २०२० रोजी नाशिक एमआयडीसीतून दोघांना अटक केली.

आरोपींविरुद्ध यापूर्वीही बदलापूर, वाशी, धुळे, पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. हे दोघेही एटीएम केंद्रामध्ये येणाºया वयोवृद्धांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएमकार्ड मिळवून त्याआधारे पैसे काढून घेत असत. त्यांनी अशा प्रकारे १०० पेक्षा जास्त फसवणुकीचे प्रकार केल्याची शक्यता असून त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली. तसेच त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :atmएटीएम