शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

एनडीआरएफकडून ३० तरुण-तरुणींना धडे; आठवड्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:28 IST

आपत्ती निवारणासाठी जिल्ह्यातील पाच पथके तयार

ठाणे : आपत्ती कालावधीत बचाव करण्यासाठी व संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी उल्हासनगर येथील तब्बल ३० तरुण-तरुणांना आपत्ती निवारणाचे एक आठवड्याचे प्रशिक्षण दिले. यानंतर, शहापूर येथील पथकास प्रशिक्षण पुणे येथे दिले जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून पाच पथके तयार केली आहेत. यामध्ये उल्हासनगर येथील तरुणांच्या पथकाचे प्रशिक्षण पूर्ण झाले. शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण येथील पथकांची या प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. प्रत्येक पथकात ३० जणांचा समावेश आहे. उल्हासनगर वगळता कोणत्याही पथकात मुली नाहीत. उल्हासनगरमधील पथकात १२ मुली आहेत. उल्हासनगरनंतर शहापूरच्या पथकास पुणे येथे प्रशिक्षणास पाठवले जाणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. सध्या ठिकठिकाणी भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, अपघात अशा आपत्तींवर मात करण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधीलकीच्या तरुणांची प्रशिक्षणासाठी योग्यता पाहून निवड करण्यात आली.उल्हासनगरच्या या ३० युवकयुवतींनी पुणे येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अंतर्गत ठाणे येथील नेहरू युवा केंद्र्रे, यूएनडीपी, यूएनव्ही इंडिया यांच्या सहकार्याने सहा दिवसांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले. नेहरू युवा केंद्र ठाणेच्या जिल्हा युवा समन्वयक हिंदप्रभा कर्वे यांनी उल्हासनगर या ३० युवक व युवतींची या प्रशिक्षणासाठी निवड करून त्यांना यावेळी एनडीआरएफच्या जवानांनी प्राथमिक उपचारपद्धतीचीही माहिती सांगितली. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या युवकयुवतींना प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यात आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे अवर्णनीय समाधान आम्हाला मिळणार असल्याचे प्रशिक्षणार्थी व्यंकटेश वेमुगांटी यांनी सांगितले.