शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१९५३ गावांत आज सातबारा होणार आॅनलाइन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:16 IST

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्यात येणार आहे.

सुरेश लोखंडेठाणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्यात येणार आहे. या गावांपैकी अंबरनाथ तालुक्यातील बांदणवाडीतील शेतक-यांचे १०० टक्के डिजिटल सातबारा आॅनलाइन झाला असून त्यांच्या वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी होत आहे.

जिल्हाभरात सुमारे एक लाख ७० हजार ६५६ खातेदार शेतकरी आहेत. यामध्ये एक हेक्टरपर्यंतच्या अत्यल्प भूधारक शेतकºयांपासून ते दोन हेक्टरपर्यंतचे अल्पभूधारक, चार हेक्टरपर्यंतचे लघु, मध्यम, मध्यम भूधारक १० हेक्टरपर्यंत आणि मोठे शेतकरी १० हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकºयांचा जिल्ह्यात समावेश आहे. जिल्हाभरातील एक हजार ९५३ गावांमधील शेतजमिनींचे सातबारा आॅनलाइन डिजिटल करण्याचे काम काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे.

सद्य:स्थितीला १०० टक्के डिजिटल सातबारा अंबरनाथच्या बांदणवाडी या महसुली गावातील शेतजमिनीचे तयार झाल्याची माहिती या योजनेचे काम हाताळणारे उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी यांनी ‘लोकमत’ला दिली. या आॅनलाइन डिजिटल मोडच्या दृष्टीने एक हजार ९५३ महसुली गावांपैकी आतापर्यंत ८९८ गावांतील शेतजमिनीच्या डिजिटल सातबा-यांसाठी घोषणा प्रपत्र-३ पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित एक हजार ५५ गावांचे काम अर्धवट शिल्लक असल्याच्या वृत्तास वळवी यांनी दुजोरा दिला आहे. या योजनेच्या सातबारा वितरणास शुभारंभ होत असला, तरी १०० टक्के काम पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.राज्यभर डिजिटल स्वाक्षरीनिशी सातबारा उपलब्ध होत असल्याच्या मुहूर्तावर ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांचा सातबारादेखील आजपासून आॅनलाइन देण्यास प्रारंभ होत आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात होणार आहे. या दिवशी एकाच वेळी राज्यभरातील अन्य जिल्ह्यांतही डिजिटल सातबारा आॅनलाइन उपलब्ध होणार आहेत.