शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या काेविड सेंटरमधील १९४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:17 IST

तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांची भरती : आरोग्य संघटनेची मागणी

- अजित मांडकेठाणे : कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अपुरी पडू लागल्यामुळे ही महामारी जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांची भरती केली आहे. त्यानुसार सध्या तब्बल दोन हजार कर्मचारी या कोविड सेंटरमध्ये काम करीत आहेत. त्यातील ६० कर्मचारी कमी केले असले तरी उर्वरित १९४० कर्मचाऱ्यांना सेवेत कायम काम करण्याची संधी हवी आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाला सुरुवात झाली. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेचा स्टाफ कमी पडू लागला होता. तसेच रुग्णालयेदेखील कमी पडू लागली. त्यामुळे महापालिकेने शहराच्या विविध भागात तात्पुरती कोविड सेंटर सुरू केली. त्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ सुरुवातीला तीन महिन्यांसाठी तर काही ठिकाणी सहा महिन्यांसाठी घेतले. परंतु, साथ सुरू राहिल्यास हे कंत्राट पुन्हा तीन ते सहा महिन्यांसाठी पुढे वाढविले.

त्यातही साथ आटोक्यात आल्यास या कर्मचाऱ्यांना त्या त्या वेळेस कामावरून कमी केले जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार डॉक्टर, नर्सेस, आया, वॉर्डबॉय, पॅथॉलॉजिस्ट, इतर टेक्निशिअन आदींसह साफसफाई करणारा कर्मचारी वर्ग असा एकूण दोन हजारांचा स्टाफ भरती केला. परंतु, आता हळूहळू कोरोनाची साथ आटोक्यात येऊ लागल्याने महापालिकेने काही कोविड सेंटरही बंद केली आहेत. आजघडीला प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ८०७ एवढी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचा स्टाफही कमी केला  आहे. 

त्यानुसार आतापर्यंत ६० कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. परंतु, ब्रिटनमध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यानुसार आणि पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने महापालिकेने इतर कोविड सेंटर सुरूच ठेवून तेथील स्टाफही तसाच ठेवला आहे. त्यानुसार १९४०चा स्टाफ अंदाजे कंत्राटी स्वरूपात काम करीत आहे. ही तात्पुरत्या स्वरूपाची नाेकरी संपुष्टात आल्यावर काय करायचे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे