शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

दोन कोटींचा १८ हजार क्विंटल भात गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:20 IST

कारण अस्पष्ट : आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने केली चौकशीची मागणी

रवींद्र सोनावळे

शेणवा : केंद्र शासनाच्या आधारभूत भातखरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने ठाणे-रायगड जिल्ह्णांतील शेतकºयांकडून २००९-१० ते २०१६-१७ या आठ वर्षांत खरेदी केलेला आठ कोटी ७१ लाख ५० हजारांचा ५६ हजार क्विंटल भात ११८ गोदामांत ठेवला होता. यातील तीन कोटी ७२ लाखांच्या २४ हजार क्विंटल भाताची भरडाई करून लिलावाद्वारे विक्री झाल्यानंतर ३२ हजार क्विंटल भात शिल्लक असणे अभिप्रेत होते. प्रत्यक्षात १४ हजार क्विंटलच भात आढळून आला आहे. (भरडाईनंतर यातील १० हजार क्विंटल भाताची लिलावाद्वारे शासनाने विक्री केली असून, चार हजार क्विंटल भात कानविंदे येथील मध्यवर्ती गोदामात ठेवण्यात आला आहे.) यात दोन कोटी ७९ हजार रुपये किमतीच्या १८ हजार क्विंटल भाताची घट आढळली आहे. उंदीर, घुशींचा प्रादुर्भाव किंवा ऊन-वारा-पावसामुळे भात सडला की तो चोरीस गेला, याची चौकशी करण्याची मागणी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक विनय एडगे यांनी जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापन कार्यालयाकडे केली आहे.

आधारभूत भातखरेदी योजनेंतर्गत शासनाने यंदा भातखरेदीसाठी २६ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली असून ३१ मार्चपर्यंत शेतकºयांकडून भातखरेदी करण्यात येणार आहे. एक हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल दराने ही भातखरेदी करण्यात येत असून, भात ठेवण्यासाठी तालुक्यातील शहापूर, किन्हवली, अघई, डोळखांब, खर्डी, अंबर्जे, टेंभा-मढ येथील सात गोदामे दोन रुपये ४० पैसे प्रतिक्विंटल प्रतिमहिना दराने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. प्रतिबारदाना शेतकºयांना २० रुपये देण्यात येत आहेत. यावर्षी महिनाभरात चार कोटी ६० लाखांचा २६ हजार ७०० क्विंटल भातखरेदी करण्यात आल्याचे एडगे यांनी सांगितले.किन्हवलीत शेतकºयांचा भात असुरक्षितकिन्हवली भातखरेदी केंद्रांतर्गत बेडिसगाव येथील भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये भातखरेदी करण्यात येत असून खरेदी केंद्रप्रमुख गुलाब सदिगर येथे उशिरा येत असल्याने शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला भात खरेदीअभावी रात्री गोदामाबाहेर ठेवावा लागतो. येथे सुरक्षारक्षक नसल्याने भाताच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न शेतकºयांना भेडसावतो आहे.कर्मचाºयांचा अभावकर्मचारी संख्या कमी असल्याने केंद्रप्रमुखावरच भातखरेदी करणे आणि त्याची सुरक्षा करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. कार्यालयात ४६ कर्मचाºयांची मंजुरी असताना अवघे सहाच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातीलही एका कर्मचाºयाने निवृत्ती घेतली असून एक कर्मचारी दीर्घकालीन रजेवर आहे. परिणामी, सध्या चारच कर्मचारी कार्यरत असून निवृत्त कर्मचाºयाला तीन महिन्यांसाठी कार्यरत ठेवण्यात आले आहे. कर्मचारी नसल्याने कामात विलंब होत असल्याची खंत एडगे व्यक्त करतात.डोळखांबमध्ये भातखरेदी रखडलीभातखरेदी केंद्रप्रमुखाच्या अनुपस्थितीमुळे डोळखांब भातखरेदी केंद्रांतर्गत भातखरेदीचे काम रखडले आहे. ती लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी मोर्चा काढणार असल्याचे समजते.गेल्या वर्षी एक हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेल्या सहा कोटी २० लाखांच्या ४० हजार क्विंटल भाताची भरडाई करून शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. - विनय एडगे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ

टॅग्स :thaneठाणे